मुंबई

मुंबईत घरात घुसून विवाहित महिलेवर अत्याचार, तीन नराधमांना अटक

पूजा विचारे

मुंबईः नालासोपाऱ्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका विवाहित महिलेवर घरात घुसून तीन नराधमांनी बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी नालासोपारा पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. 

नालासोपारा पश्चिम परिसरात राहणारी महिला भाजी विक्रीचा व्यवसाय करते. तिचा पती रिक्षाचालक आहे. शुक्रवारी रात्री तिचा पती रिक्षामध्ये सीएनजी भरण्यासाठी मीरा भाईंदर येथे गेला होता. त्यावेळी महिला एकटीच घरी होती. तिच संधी साधून आरोपींनी घरात प्रवेश केला. घरात घुसून या तिन्ही नराधमांनी आळीपाळीनं महिलेवर बलात्कार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तेवढ्यात तिचा पती घरी आला. पती येताच या आरोपींनी त्यालाही जबर मारहाण केली आणि तिघांनीही तिथून पळ काढला.

या प्रकरणी महिलेनं नालासोपारा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीवरुन नालासोपारा पोलिस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आता पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. आरोपींना शनिवारी वसई न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान नालासोपारा पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

या प्रकारानं परिसरातल्या महिलांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. तसंच या आरोपींना कठोर शिक्षा सुनावली पाहिजे, अशी मागणी परिसरातले नागरिक करत आहेत.

gang outrage of woman nalasopara three Accused arrested

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : शिवसेना पक्ष, चिन्ह संदर्भात उद्या सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी

Atiq Ahmed Son Accident Video: अतिक अहमदच्या मुलाचा अपघात कसा झाला? कार डिव्हायडरला धडकली अन् हवेत उडाली, Live Video Viral

Scam 2010 Marathi Actor: SCAM 2010 मध्ये झळकणार मराठमोळा चेहरा; तुम्ही ओळखलंत का या अभिनेत्याला? पत्नी गाजवतेय मराठी मालिका

YCMOU Exam: धक्कादायक! एकाच विद्यार्थ्याने एकाच वेळी दिल्या दोन परीक्षा, 'मुक्त'च्या परीक्षेत ४० जणांचा प्रताप; विद्यापीठाकडून दखल

Ethanol Production Restrictions: उसापासून इथेनॉल निर्मितीवर निर्बंध?; साखरेचे भाव नियंत्रणासाठी उत्पादन वाढविणार

SCROLL FOR NEXT