Gangster Chhota Rajan brother Deepak Nikalje
Gangster Chhota Rajan brother Deepak Nikalje esakal
मुंबई

Chhota Rajan : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या भावावर मोठी जबाबदारी; 'या' पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड

सकाळ डिजिटल टीम

राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे, त्यामुळं सर्वच राजकीय पक्ष आपआपल्या पातळीवर निवडणुकांची मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत.

मुंबई : सध्या राज्यात प्रचंड वेगाने राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. राजकारणाबाबत आता आणखी एक बातमी समोर आलीये. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन (Gangster Chhota Rajan) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

डॉनचा भाऊ आरपीआय ए गटाचा राष्ट्रीय अध्यक्ष बनला आहे. आरपीआय ए गटाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पुन्हा छोटा राजनचा भाऊ दीपक निकाळजे (Deepak Nikalje) यांची निवड झालीये. आरपीआयच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. चेंबूर इथं नुकतीच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची (Republican Party of India A) एक परिषद पार पडली. यावेळी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पुन्हा छोटा राजनचा भाऊ दीपक निकाळजेंची निवड करण्यात आली.

राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे, त्यामुळं सर्वच राजकीय पक्ष आपआपल्या पातळीवर निवडणुकांची मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत. भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षापासून आरपीआयचे छोटे-छोटे गटही या कामाला लागले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आरपीआयच्या (ए) राष्ट्रीय अध्यक्षपदी गँगस्टर छोटा राजनचा भाऊ दीपक निकाळजेंची फेरनिवड करण्यात आलीये.

चेंबूरमध्ये पक्षाची नुकतीच एक परिषद पार पडली. यावेळी अध्यक्षपदी पुन्हा दीपक निकाळजेंची निवड करण्यात आली. या परिषदेत देशभरातील 30 राज्यांमधून आरपीआयचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी आंबेडकरी विचारांच्या सर्वच नेत्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या बॅनरखाली एकत्र येऊन काम करावं, अशी भूमिका निकाळजेंनी मांडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT