Ecofriendly ganpati festival sakal media
मुंबई

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गणेशभक्तांचा कल

शाडू आणि चाॅकलेटच्या गणेशमूर्तीची गणेशभक्तांमध्ये क्रेझ

कुलदीप घायवट

मुंबई : राज्य सरकारच्या (Maharashtra government) सूचनेप्रमाणे यंदाही गणेशोत्सव (Ganpati festival) साधेपणाने साजरा करण्याचे निर्देश आले आहेत. त्यामुळे, राज्य सरकारच्या नियमांचे पालन (corona rules) करून गणेशोत्सवामधील गोडवा आणि आनंद वाढविण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव (ecofriendly festival) साजरा करण्यासाठी गणेशभक्तांचा कल आहे. लाल माती शाडूची माती आणि शेणखताचा वापर करून 'गो ग्रीन' (go green festival) गणेशोत्सव साजरा केला जात आहे. तर, अनेक गणेशभक्तांकडून (ganesha devotees) चाॅकलेटची मूर्तीचे पूजन करण्याचे प्रमाण वाढत आहे. या दोन्ही मूर्तींचे विसर्जन करणे सोपे असल्याने अशा पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याची क्रेझ वाढत आहे.

कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे सरकारकडून साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. घरगुती गणपतीकरिता 2 फुटांच्या मर्यादेत असावी. पारंपारिक गणेशमूर्तीएवजी घरातील धातू, संगमरवरच्या मूर्तीचे पूजन करावे. शाडूच्या मातीची मूर्ती असल्यास घरातच विसर्जन करावे, अशी नियमावली जून 2021 मध्ये जाहिर केली होती. यावेळी गणेशभक्तांमध्ये यंदा गणेशोत्सव साजरा कसा करायचा असा प्रश्न पडला होता. मात्र, 'गो ग्रीन बाप्पा' ही संकल्पनेच्या आधारावर पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यावर गणेशभक्तांचा कल आहे.

'गो ग्रीन बाप्पा' या संकल्पनेच्या आधारावर बाप्पाची मूर्ती ही लाल माती, शेणखत व कागदाच्या लगद्यापासून तयार केली जाते. मागील चार वर्षांपासून ही संकल्पना राबवित आहोत. या मूर्तीचे विसर्जन घराच्या घरी बागेत, कुंडीत करणे शक्य आहे. त्यामुळे गणेशभक्तांचा ही मूर्ती घेण्यास प्रतिसाद वाढत आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक येथे घरपोच बाप्पा पोहचविला जात आहे. त्यामुळे कोरोना काळात गणेशभक्तांना बाहेर पडण्याची गरज भासत नाही. तर, मागील दोन वर्षांत दुबई, थायलंड येथे देखील बाप्पा पाठविले आहेत. बाप्पाच्या मूर्तीसह जास्वंद किंवा बेलाचे रोप देतो. बाप्पाचे घरातच विसर्जन करून ते रोप त्या मातीत लावून बाप्पाचा आशीर्वाद कायम सोबत राहील, अशी संकल्पना मांडली आहे. सुरूवात फक्त 3 मूर्तीपासून केली होती, तर, आता यंदाच्यावर्षी सुमारे 250 मूर्ती घरपोच करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती संकल्पनाकार सोनाली कुंभार यांनी दिली.

चाॅकलेट गणेश मूर्ती बनविण्याचा ट्रेंड वाढला आहे. चाॅकलेट मूर्ती बनविण्याचा उद्देश असा आहे की, या मूर्तीची पूजा झाल्यानंतर विसर्जनाच्यावेळी ही मूर्ती दूधात विसर्जित केली जाते. त्यानंतर या विरघळलेल्या मूर्तीचा चाॅकलेट मिल्क शेकचा प्रसाद म्हणून वाटले जाते. हा ट्रेंड सध्या गुजरातींमध्ये मोठ्याप्रमाणात सुरू आहे. महाराष्ट्रीयन माणसांमध्ये हा ट्रेंड जास्त प्रमाणात दिसून येत नाही. चाॅकलेटच्या मूर्त्या या साच्यामधून बनविल्या जातात. तर, काही गणेशभक्त चाॅकलेटच्या मोठ्या गोळ्यावर कोरीव काम करून त्याला गणेशमूर्तीचे रुप देतात. बिटर किंवा कडवड असलेल्या डार्क चाॅकलेटचा वापर मूर्ती बनविताना केला जातो.

- जान्हवी राऊळ, ब्रॅंडगुरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

Navi Mumbai : APMC मार्केटजवळ भीषण आग, १० पेक्षा जास्त ट्रक, टेम्पो जळून खाक

Bus-Car Accident : कोल्हापुरातून महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परतताना भीषण अपघात; बस-कारच्या धडकेत चौघे ठार, एक जण जखमी

Panchang 7 July 2025: आजच्या दिवशी ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा किमान 108 जप करावा

SCROLL FOR NEXT