मुंबई

विद्यार्थी लसीकरणाबद्दल आदित्य ठाकरेंचं महत्त्वाचं टि्वट

काय म्हटलय आदित्य ठाकरेंनी

दीनानाथ परब

मुंबई: परदेशी शिक्षणासाठी (overseas education) जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी येत्या सोमवारपासून वॉक इन लसीकरणाची सुविधा सुरु होणार आहे. पण कोरोना प्रतिबंधक लसीच्या (vaccine) दोन डोसमधील अंतर आणि परदेशात जायचे विद्यार्थ्यांचे वेळापत्रक या संदर्भात अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यावर राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांनी एक टि्वट केले आहे. (gap between the two doses and the scheduled/ possible departure of students for overseas Aaditya Thackeray)

"कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन डोसमधील अंतर आणि परदेशात जायचे विद्यार्थ्यांचे वेळापत्रक या संदर्भात अनेकांनी प्रश्न विचारले आहेत. लसीकरण वैद्यकीय सल्ल्यानुसारच सुरु आहे. पण महापालिका संबंधित यंत्रणांशी चर्चा करेल व विद्यार्थ्यांना शक्य ती सर्व मदत करेल" असे आदित्य ठाकरे यांनी टि्वट करुन सांगितले आहे.

परदेशात प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांसाठी येत्या सोमवारपासून वॉक इन लसीकरण सुरु होणार आहे. सोमवार, मंगळवार आणि बुधवार असे तीन दिवस राजावाडी, कुपर आणि कस्तुरबा या तीन रुग्णालयात परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लसीचे डोस दिले जातील, असे राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी टि्वट करुन सांगितले आहे.

मुंबईत लसीचा अभाव पाहता मुंबईतील लसीकरणाबाबत पालिकेला वेळोवेळी बदल करावे लागले आहेत. आता नव्या नियमांतर्गत अभ्यासासाठी परदेशात जाणाऱ्या मुंबईतील विद्यार्थ्यांना लसीकरणासाठी (student vaccination) वॉक-इन (Walk in vaccination) सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशाची कागदपत्रे, व्हिसाची कागदपत्रे द्यावी लागतील.

कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिनच्या डोसमध्ये किती अंतर?

'कोव्हिशिल्ड'च्या दोन डोसमधील अंतर वाढवण्यात आले आहे. सुरुवातीला कोव्हिशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस ४ ते ६ आठवड्यांमध्ये घेण्याचा सल्ला देण्यात आला होता. पण आता हे अंतर १२ ते १८ आठवड्यांनी वाढवण्यात आले आहे.

कोव्हिशिल्ड कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर मजबूत रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते. कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवलं असलं, तरी कोव्हॅक्सिनच्या दोन डोसमध्ये जे अंतर आहे, त्यात कुठलाही बदल केलेला नाही. कोव्हिशिल्डच्या पहिल्या डोसनंतर जितकी रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते, त्या तुलनेत कोव्हॅक्सिनच्या पहिल्या डोसनंतर तयार होत नाही. त्यामुळे कोव्हॅक्सिनच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्यात आलेलं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

Pune Cyber Crime : लग्नाचे आमिष दाखवून पुण्यात ४३ वर्षीय महिलेला २६ लाखांचा गंडा; येरवड्यात गुन्हा दाखल!

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

SCROLL FOR NEXT