kharghar
kharghar 
मुंबई

खारघर वसाहतीत पाच दिवसापासून कचरा पडून, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त 

सकाळवृत्तसेवा

खारघर - सिडकोच्या घन कचरा विभागात काम करणारे घंटागाडीचे वाहन चालकाने आणि कामगाराने घरी गणपती असल्याचे सांगून अचानक पाच दिवस गणपती उत्सव असे पर्यंत येणार नाही असे सांगून काहीने रजा घेतली तर काहीने दांडी मारल्याने खारघर वसाहतीत प्रत्येक सोसायटीच्या प्रवेशद्वार आणि रस्त्यालगत ठिकठिकाणी पडून दुर्गंधी पसरली आहे. 

सिडको वसाहतीत सिडकोच्या आरोग्य विभाग कडून घन कचर्‍याचे काम पहिले जाते. घंटागाडीवर काम करणारे वाहन चालक आणि कामगार हे बहुतांस स्थानिक आहेत. त्यात  अनेकाच्या घरी गणपती असल्यामुळे अनेकांनी ठेकेदारांना सांगून रजा घेतली. वाहन चालक नसल्यामुळे रस्ते  साफसफाई करणाऱ्या काही कामगारानी दांडी मारल्यामुळे रस्त्यावर कचरा पडून आहेत. तर घंटागाडी बंद असल्यामुळे खारघर परिसरातील सोसायटीच्या आवारात आणि प्रवेशद्वारासमोर कचरा पडून आहेंत. गेल्या पाच दिवापासून कचरा पडून असल्यामुळे दुर्गंधी पसरू लागल्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी भीती नागरिकामध्ये पसरली आहे. या विषयी सिडकोच्या मुख्य आरोग्य अधिकारी बी एस बावस्कर यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही. 

गजानन चव्हाण 17/9 - सोबत - सेक्टर वीस मध्ये कचरा पेटीतून ओसंडून वाहणारा कचरा फोटो जोडला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT