mumbai-gauri-ganpati-visarjan 
मुंबई

गणेशोत्सव2019 : गणरायाला भावपूर्ण निरोप

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुसळधार पाऊस झोडपत असतानाही ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात हजारो गणेशमूर्तींचे भक्तिभावाने विसर्जन करण्यात आले. तीन दिवसांच्या पाहुणचारानंतर गौरींनाही भावपूर्ण निरोप देण्यात आला.  

चौपाट्या आणि विसर्जन स्थळांवर शनिवारी सकाळपासूनच गणेशभक्तांनी गणेशमूर्तींची आणि गौरींची विधिवत पूजाअर्चा, विसर्जनाला सुरुवात केली.  जुहू, गिरगाव, दादर, माहीम चौपाटी, नैसर्गिक तलाव आणि कृत्रिम तलाव आदी ठिकाणी आपल्या लाडक्‍या गणरायाला निरोप देण्यासाठी आबालवृद्धांनी एकच गर्दी केली होती. पालिकेने विसर्जनस्थळी जय्यत तयारी केली होती. वैद्यकीय पथक, घनकचरा विभागाचे सफाई कर्मचारी, निर्माल्य टाकण्यासाठी निर्माल्य कलश, निर्माल्य वाहून नेण्यासाठी डम्पर, वीजपुरवठा, पिण्याचे पाणी, विसर्जनासाठी तराफे आदी सेवा उपलब्ध करण्यात आल्या होत्या. शनिवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत मुंबईतील समुद्र, तलाव, खाडी आणि कृत्रिम तलावांत घरगुती ५,५४० आणि सार्वजनिक ३२ गणेशमूर्ती तसेच ९३६ गौरी अशा एकूण ६,५०८ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यात केवळ कृत्रिम तलावांत सार्वजनिक पाच आणि घरगुती ९५२ गणेशमूर्ती व १५२ गौरी अशा एकूण १,१०९ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Letter : मनोज जरांगेंचा ५०० कोटींचा ऑडिओ बॉम्ब’: संजय राऊतांचे अमित शाहांना पत्र, केली 'ही' महत्त्वाची मागणी

Food Inflation: भाजी-भाकरीसाठीही बजेट काेलमडले! दुष्काळाच्या सुरुवातीलाच महागाईच्या झळा; भाजीपाल्यासह ज्वारी, कडधान्याच्या भावातही वाढ

लाडक्या बहिणींना दिवाळीआधी मिळणार ३ हजार रुपये? सप्टेंबर-ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

Jio IPO GMP: जिओ IPO अलॉटमेंटपूर्वी शेअर बाजारात मोठी घसरण; IPO मधून नफा होणार की नुकसान? GMP काय सांगतो?

Livestock Insurance Scheme : पशुधन विम्यासाठी आता 85 टक्के अनुदान; एका कुटुंबातील 10 जनावरांना मिळणार विमा संरक्षण, पशुपालकांना मोठा दिलासा

SCROLL FOR NEXT