mumbai best bus sakal
मुंबई

Best Bus Drivers on Strike : ऐन कामाच्या वेळी मुंबईकराचे हाल! घाटकोपर डेपोतील बेस्ट कर्मचारी अचानक संपावर

रोहित कणसे

मुंबई : शहरातील घाटकोपर बेस्ट बस डेपोमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आज सकाळी अचानक संप पुकारला आहे. पगारवाढ आणि बेस्टच्या सुविधा मिळत नसल्याने कर्मचारी आज संपावर आहेत. सकाळी नऊ वाजता हे कर्मचारी आझाद मैदान येथे आंदोलन करणार आहेत. दरम्यान अचानक पुकारण्यात आलेल्या संपामुळे प्रवाशांचे हाल झाल्याचे पाहयला मिळाले.

काही वर्षांपासून त्यांच्या पगारवाढीच्या मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांना सध्या मिळणारे १६ हजार वेतन वाढवून ते २५ हजार करण्यात यावे ही मागणी अनेक दिवसांपासून रखडली आहे. त्यांची ग्रॅच्युएटी तसेच इतर सुविधा बेस्ट कडून मिळत नाहीयेत.

दरम्यान कामगारांच्या मागण्यासाठी काही समाजसेवकांकडून आझाद मैदान येथे उपोषणान केले जात आहे. त्यांना समर्थन देण्यासाठी घाटकोपर डेपो येथील २८० बेस्ट चालक अचानक सुट्टीवर गेले आहेत. आता हे चालक आझाद मैदान येथे जाऊन आंदोलन करणार आहेत.

याचा मोठा फटका घाटकोपर डेपोवरून पुर्व आणि पश्चिम उपनगराकडे जाणाऱ्या बेस्टच्या गाड्यांना बसणार आहे. जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत सामूहिक सुट्टीवर जाण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे सकाळी कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना यामुळे मनस्तप सहन करावा लागू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT