Ghatkopar Hoarding Collapse Esakal
मुंबई

Ghatkopar Hoarding Collapse: होर्डिंग कोसळलेल्या पेट्रोल पंपाला लागली आग, तब्बल ४० तासांनंतरही बचावकार्य सुरूच

Ghatkopar Hoarding Collapse: घाटकोपर इथं पेट्रोलपंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगमुळं १४ जणांचा मृत्यू झाला तर ८८ जण जखमी झाले आहेत. अद्याप या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

घाटकोपर इथं पेट्रोलपंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगमुळं १४ जणांचा मृत्यू झाला तर ८८ जण जखमी झाले आहेत. अद्याप या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे. यादरम्यान पेट्रोल पंपाला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. होर्डिंग दुर्घटनेच्या ठिकाणी अद्याप बचावकार्य सुरू आहे. यावेळी गॅस कटरचा वापर करत असताना आग लागल्याची घटना समोर आली आहे. काही वेळातच आग नियत्रंणात आणली.

होर्डिंग दुर्घटनेला ४० तास उलटून गेले तरीही अद्याप बचावकार्य सुरू आहे. या भीषण दुर्घटनेत आत्तापर्यंत १४ जमांचा मृत्यू झाला आहे. तर ८८ जण जखमी झाले आहेत. या होर्डिंगखाली अद्याप काही जण अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे.

पंतनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी पंतनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पेट्रोल पंप मालक भावेश भिंडे आणि जाहिरात कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसी कलम 304, 338, 337, 34 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात अधिक तपास पंतनगर पोलीस करत आहे.

मुंबई महानगरपालिका डिझास्टर अॅक्ट अंतर्गत संबंधित कंपनी आणि रेल्वे प्राधिकरणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ((120 बाय 120 फुटाचा हा बॅनर होता) राज्य सरकारच्या जागेत हा अनधिकृत बॅनर लावल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनेतील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईतल्या सर्वच होर्डिंग्जचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्याचबरोबर अनधिकृत होर्डिंग्ज तातडीने हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Government: गृहखातं हातातून निसटलं, पण 'हे' मलाईदार विभाग नितीश कुमारांच्या 'जेडीयू'कडे

Gondia Crime : वडिलाचा मुलीवर लैंगिक अत्याचार; अत्याचार पीडित मुलीने एका बाळाला दिला जन्म

Gadchiroli News : मारेदुमिल्ली जंगलातील चकमक ‘खोटी कथा’; आमच्या कार्यकर्त्यांना बनावट एनकाउंटरमध्ये मारले—माओवादी पत्रकाचा आरोप!

Pune Crime: कोरेगाव पार्कमध्ये वेश्या व्यवसायाचं रॅकेट उघडकीस, हॉटेलवर पोलिसांचा छापा; विदेशी महिला अटकेत

Gadchiroli News : शरणागतीनंतर नवजीवनाची पहाट; अर्जुन–सम्मी दाम्पत्याला पुत्ररत्न, पुनर्वसन योजनांचा गडचिरोलीत उज्ज्वल परिणाम!

SCROLL FOR NEXT