Ghatkopar Hoarding Collapse Esakal
मुंबई

Ghatkopar Hoarding Collapse: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचे बचावकार्य तब्बल ६० तासांनंतर पूर्ण; मुंबई पालिका आयुक्तांनी दिली माहिती

Ghatkopar Hoarding Collapse: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील बचावकार्य अखेर पुर्ण झालं आहे. या दुर्घटनेत एकूण १६ जणांचा मृत्यू झाला आहे. आज हे बचावकार्य पुर्ण झाल्याची माहिती मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Ghatkopar Hoarding Collapse: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील बचावकार्य अखेर पुर्ण झालं आहे. या दुर्घटनेत एकूण १६ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी झाले आहेत. आज हे बचावकार्य पुर्ण झाल्याची माहिती मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली आहे. गेल्या तीन दिवसांपासून सेन्सर आणि श्वान पथक, NDRFच्या मदतीने होर्डिंगच्या ढिगाऱ्याखाली कोणी अडकले आहे का याचा शोध घेतला जात आहे. हो

भूषण गगराणी यांनी माहिती देताना सांगितले, या दुर्घटनेत १६ दणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे बचावकार्य आता पुर्ण झालं आहे. या बचावकार्यात मुंबई महानगरपालिका, मुंबई पोलीस, एमएमआरडीए, एनडीआरएफ, महानगर गॅस या सर्व यंत्रणांनी समन्वय साधत बचावकार्य पुर्ण केलं आहे. दुर्घटनेच्या ठिकाणी संपुर्ण तपासणी करण्यात आली आहे, यामध्ये अन्य कोणतीही व्यक्ती अडकलेली नाही. आता होर्डिंगचा मलबा हटवण्याचे काम सुरू आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुंटुबीयांना त्वरीत मदत दिली जाईल.

मुंबईतील अनाधिकृत होर्डिंग बाबतीत कारवाया हाती घेतल्या आहेत. होर्डिंगसाठी ठरवलेली मानके पाळली पाहिजेत. त्यांची पायाभरणी, हवा जाण्याची सोय ही सर्व मानके ठरवून दिलेली आहे. ती पाळली गेली पाहिजेत. रेल्वेला देखील त्याप्रमाणे आदेश दिले आहेत या मानकांचे पालन झाले पाहिजे. होर्डिंग लावताना परवानगी घेणे आवश्क आहे. सर्व नियम पाळले गेले पाहिजेत, असंही मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी म्हटलं आहे.

सर्व होर्डिंगची स्ट्रक्चरल स्टेबिलिटी करून घेणे हे बंधनकारक आहे. स्ट्रक्चरल स्टेबिलिटी करून त्यांना महानगपालिकेकडे प्रमाणपत्र सादर केले पाहिजेत. या दुर्घटनेत मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर आता मुंबईतील परवानाधारक होर्डिंग आहेत त्या सर्वांची तपासणी चालू आहे, अशी माहिती गगराणी यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Grand Tour 2026 : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्यांचे जाळे; ९०० कोटींचा खर्च अपेक्षित

Pali News : रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल! 'या' तारखेपर्यंत दुपारऐवजी भरणार सकाळी शाळा

Vidhan parishad Exit Poll 2026: विधान परिषद निवडणूक! महायुतीची एकतर्फी सरशी? 12 पैकी किती जागा जिंकणार?

Crime: क्रूरतेचा कळस! घराबाहेर पडताच टोळक्यानं गाठलं; आधी महिलेवर सामुहिक अत्याचार, नंतर गुप्तांगामध्ये काठी, काडतूस टाकलं अन्...

Pune Fraud News : पर्यटन व्यावसायिकाकडून महिलेची दोन लाखांची फसवणूक; टूरला येणाऱ्या सदस्याचा मृत्यू झाल्याचे सांगत सहल केली रद्द

SCROLL FOR NEXT