Girish Mahajan
Girish Mahajan Sakal
मुंबई

धमकी प्रकरणी मुंबई हायकोर्टाचा गिरीश महाजन यांना दिलासा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात (kothrud police station) दाखल असलेल्या तीन वर्षांपूर्वीच्या एका फौजदारी फिर्यादीमध्ये भाजपचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high court) दिलेला दिलासा मुंबई उच्च न्यायालयाने ता 24 पर्यंत वाढविला आहे. या प्रकरणात ता. 24 पर्यंत महाजन यांच्यासह दोघांविरोधात कठोर कारवाई करु नये असे आदेश न्यायालयाने पुणे पोलिसांना (Pune police) दिले आहेत. (Girish mahajan gets relief in threatening case by mumbai high court)

कोथरूड पोलीस ठाण्यात महाजन आणि त्यांचे स्वीय सचिव रामेश्वर नाईक यांच्या विरोधात धमकाविल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. याविरोधात दोघांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. जानेवारी 2018 मध्ये घडलेल्या कथित घटनेवर आता डिसेंबरमध्ये फिर्याद केली आहे, असा युक्तिवाद महाजन यांच्या वतीने करण्यात आला आहे. बुधवारी न्या प्रसन्ना वार्ले आणि न्या अनिल किल्लोर यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली.

जळगावमधील निभोरा पोलीस ठाण्यात याबाबत प्रथम फिर्याद नोंदविण्यात आली होती. जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे विश्वस्त एड विजय पाटील यांनी ही तक्रार केली आहे. मात्र कोथरूड परिसरात ही घटना घडल्यामुळे फिर्याद येथे वर्ग करण्यात आली आहे. तीन वर्षापूर्वी घडलेल्या कथित घटनेवर आता फिर्याद केली आहे, त्यामुळे ती रद्द करण्यासाठी हे पुरेसे कारण आहे, असा दावा महाजन यांच्या वतीने करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

PM Modi's Advice To Muslims: जगभरातला मुसलमान बदलतोय पण... मुस्लिम धर्मियांना पहिल्यांदाच PM मोदींनी का दिला सल्ला?

Shekhar Suman : शेखर यांच्या मुलाला होता 'हा' गंभीर आजार; लेकाच्या निधनानंतर उचललं गंभीर पाऊल

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात दोन गटांमध्ये हाणामारी, शेकाप कार्यकर्ते अन् शिवसैनिक भिडले

बापरे! बॉल समजून पकडला बॉम्ब ... 13 वर्षीय मुलाचा स्फोटात मृत्यू , नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT