girl killed in accident two injured alcohol police arrest mumbai
girl killed in accident two injured alcohol police arrest mumbai sakal
मुंबई

Accident News : मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून अपघात; अपघातात साडे तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील बीकेसी परिसरात रस्त्याच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका चारचाकीने अन्य एका चारचाकी गाडीला धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात स्वाती चौधरी नावे साडेतीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला असून अन्य दोन व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत.

ओम चौधरी आणि त्यांचे मित्र विनोद यादव हे दोघे गंभीर जखमी झाले असून दोघांनाही गुरु नानक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी 8 मार्चला संध्याकाळी 5 च्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, विश्वास अट्टावर आरोपी चालकाचं नाव असून पोलीसांनी त्याला अटक केली आहे. तसेच गाडी चालवताना तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

आरोपी चालकाने बुधवारी संध्याकाळी बीकेसी पोलीस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या ट्रॅफिक सिग्नलजवळ एक ऑटोरिक्षासह पादचाऱ्याला धडक दिली. त्यानंतर तिथून वेगाने पळ काढताना त्याने हॉटेल ट्रायडन्ट येथील मार्गावरून विरुद्ध दिशेने जात समोरून येणाऱ्या एका कारला धडक दिली.

या भीषण अपघातात स्वाती चौधरी नावाच्या एका साडेतीन वर्षाच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर तिचे काका ओम चौधरी (25) आणि त्यांचे मित्र विनोद यादव (46) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. दोघांनाही गुरु नानक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी आरोपी गाडी चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात भादंवि आणि मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच अपघातादरम्यान आरोपी चालक मद्यधुंद अवस्थेत होता, अशी माहितीही पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, आरोपी चालकाला न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्याला 50 हजाराच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: विराटच्या सुरुवातीच्या तुफानानंतर बेंगळुरूत पावसाचं आगमन, सामना थांबला

Virat Kohli RCB vs CSK : मी एप्रिलमध्येच बॅग पॅक केली होती.... विराटला स्वतःच्या संघावर विश्वास नव्हता?

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : पुणे-मुंबई हायवेवर वाहतूक कोंडी, वाहतूक संथ गतीने

SCROLL FOR NEXT