मुंबई

कोरोनाविरोधात गिर्यारोहकही मैदानात

उत्कर्षा पाटील

मुंबई : कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्य सरकारच्या मदतीसाठी अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघाची 1400 हून अधिक स्वयंसेवकांची टास्क फोर्स तयारीत आहेत. यामध्ये 200 हून अधिक स्वयंसेवकांनी आरोग्य विभागासाठी काम करण्यास पसंती दर्शवली आहे. राज्य सरकार, पोलिस व आरोग्य यंत्रणेवरील भार कमी करण्यासाठी या स्वयंसेवकांनी मदतीची तयारी दाखवली आहे. 

कोरोना विरोधातील लढ्यात भविष्यामध्ये आणखी मनुष्यबळाची गरज भासू शकते. या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने एनसीसी, एनएसएस तसेच सामाजिक संस्थांच्या माध्यमातून स्वयंसेवकांची मोठी फळी तयार करण्याचे प्रयत्न सुरू केले होते.

याचाच एक भाग म्हणून अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघातर्फे तरुणांना विशेषतः राज्यभरातील गिर्यारोहकांना टास्क फोर्समध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला प्रतिसाद देत दोन आठवड्यात राज्यातील 36 जिल्ह्यांतून 1400 हून अधिक गिरीप्रेमींनी टास्क फोर्ससाठी नोंदणी केली.

या स्वयंसेवकांच्या आवड आणि क्षमतेनुसार वैद्यकीय सहाय्य, अत्यावश्‍यक वस्तू व धान्य वाटप, पोलिसमित्र, ज्येष्ठ नागरिक मित्र आणि समुपदेशन अशा एकूण पाच विभागांत विभागणी केली आहे. 

सर्व स्वयंसेवकांची जिल्हानिहाय सविस्तर यादी मुख्यमंत्री कार्यालय, जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तांकडे पाठवण्यात आली आहे. त्यानंतर गरज भासल्यास सरकार आपल्याला संपर्क साधतील, असे कळवण्यात आल्याची माहिती अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे यांनी दिली.

सरकारी आदेशाशिवाय आमचे कोणतेही स्वयंसेवक स्वतःहून कोणताही निर्णय घेणार नाहीत. आमचे काम सरकारी आदेशाप्रमाणे चालेल. तशी सूचना सर्व जिल्ह्यांतील स्वयंसेवकांना दिल्याचेही ते म्हणाले.


राज्य सरकारला जिल्हानिहाय टास्क फोर्सची यादी पाठवली आहे. त्याबाबत त्यांना प्रशिक्षण, त्यांची सुरक्षा याबाबत राज्य सरकारकडून विचार सुरू आहे. आमच्या फोर्समधील स्वयंसेवकांना प्रशिक्षण देऊन मदतीस घेतल्यास आरोग्य विभागातील कर्मचारी, डॉक्‍टर्स तसेच पोलिसांवरील भार काही प्रमाणात हलका होऊ शकतो. 
- उमेश झिरपे, अध्यक्ष, 
अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ. 

 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT