मुंबई

राज्यपाल नियुक्त जागांसाठी मातंग समाजाला प्राधान्य द्या; उच्च न्यायालयात याचिका दाखल

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यपालांमार्फत विधान परिषदेमध्ये निवडून येणाऱ्या आमदारांचा मुद्दा याचिकेद्वारे मुंबई हायकोर्टमध्ये दाखल झाला आहे. राज्यपालांना दिलेल्या विशेषाधिकारांमध्ये सुधारणा करून आमदार नियुक्ती करताना त्याचे चारित्र्य, गुन्हेगारी पाश्वभूमी इ.चाही विचार व्हायला हवा, अशी मागणी करण्यात आली आहे.

सामाजिक कार्यकर्ते दिलीपराव आगळे यांनी अॅड. सतीश तळेकर आणि अॅड माधवी अय्यपन यांच्या मार्फत न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकादार क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग अभ्यास आयोगाचे उपाध्यक्ष आहेत. अनुसूचित जातीमध्ये 69 समाज घटकांचा समावेश असला तरी मातंग घटकांची संख्या तुलनेत अधिक आहे. मात्र, मातंग समाजाला आमदार नियुक्तीमध्ये प्राधान्य दिले जात नाही, असे याचिकादाराचे म्हणणे आहे. येत्या 15 जूनपर्यंत विधानपरिषदेच्या बारा जागा रिक्त होणार आहेत. त्यामुळे या जागांवर नियुक्ती करताना पारदर्शक निवड प्रक्रिया अवंलबून सरसकट नियुक्ती न करता उमेदवारांचे चारित्र्य, शिक्षण, गुन्हेगारी पाश्वभूमी, सामाजिक कार्य आदींंचा विचार व्हायला हवा. त्यामुळे केंद्र सरकार आणि संसदीय समितीने यावर कार्यवाही करावी अशी मागणी याचिकेद्वारे केली आहे.

जनतेच्या हितासाठी समाजातील सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक आहे, त्या पद्धतीने सदस्यांची नियुक्ती व्हायला हवी, राज्य सरकारने याचिकादारासह विविध क्षेत्रातील गुणवंताची शिफारस राज्यपालांना करायला हवी अशी मागणीही करण्यात आली आहे. याचिकेवर मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Human Story : भावा हे कोल्हापूर आहे ! महावीर जयंतीनिमीत्त मराठा समाजातील व्यक्तीने जैन समाजाला केली कोट्यावधींची जमीन दान; असा आहे जिव्हाळा

Karad Chemical: तासवडेत स्फाेटांची मालिका सुरूच; केमिकल कंपनीत कॅन फुटून स्फाेट, ‘प्रदूषण’चे निरीक्षण!

Latest Marathi News Live Update : अंजनगावात शिवरायांच्या पुतळ्यावरून तणाव! दोन समाज आमनेसामने

त्यांना चालता येत नव्हतं... शेवटच्या दिवसांत अशी झालेली विक्रम गोखलेंची अवस्था; मराठी अभिनेत्री म्हणाली, 'त्यांच्या पोटात...'

Wife Rights India : पतीच्या मृत्यूनंतरही पत्नीला मिळते पोटगी, हायकोर्टाचा मोठा निर्णय; नेमकं काय आहे प्रकरण ?

SCROLL FOR NEXT