मुंबई

केरळातून डॉक्टर बोलवण्यासपेक्षा इथल्या डॉक्टरांना योग्य पगार द्या; राज्यातील डॉक्टर आंदोलनाच्या पवित्र्यात

भाग्यश्री भुवड : सकाळ वृत्तसेवा



मुंबई : राज्यातील जवळपास 1300 डॉक्टरांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. यामध्ये 18 वैद्यकीय महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापकांचा समावेश आहे. मागील 5 वर्षांपासून वैद्यकीय महाविद्यालयात काम करूनदेखील अद्याप नोकरीत कायम न केल्यामुळे डॉक्टरांमध्ये नाराजी आहे.  सोबतच, त्यांना मार्च महिन्याचा पगार देखील 50 टक्केच देण्यात आला. एकीकडे केरळातून दीड ते दोन लाख रुपये पगार देऊन डॉक्टरांना आणण्यात येते आणि इथे काम करणाऱ्यांना ना धड पगार देण्यात येतो, ना त्यांना नोकरीत कायम करण्यात येते. त्यामुळे संपूर्ण आयुष्य अधांतरी चालल असल्याची खंत डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. 

राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष डॉ. सचिन मूलकुटकर यांनी याबाबत सांगितले की, राज्यातील 18 वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 3100 शिक्षक आणि डॉक्टरांची पदे आहेत. तर, 7000 शिक्षकांची आवश्यकता आहेत. 3100 पैकी 50 टक्के पदे रिक्त आहेत. गेल्या 5 वर्षांपासून या रिक्त पदांवर 650 डॉक्टर तात्पुरत्या स्वरुपात काम करत आहेत. त्यांना ना वेतनवाढ मिळत आहे ना इतर सुविधा. त्यांना सेवेत कायम करावे, अशी आमची मागणी आहे. 
तसेच, शिक्षक आणि डॉक्टरांना दीड लाख पगार आहे. तर कंत्राटी शिक्षक आणि डॉक्टरांना 65 ते 70 हजारांच्या दरम्यान वेतन दिले जाते. हा भेदभाव का?  केरळ सरकार आपल्या डॉक्टरांना 10 टक्के जोखीम भत्ता देऊ शकते, मग आपले सरकार का नाही? असा सवाल डाॅ. मूलकुटकर यांनी उपस्थित केला.  सध्या कोरोनाची भयावह परिस्थिती आहे. तरीदेखील डॉक्टर एकही सुट्टी न घेता कामावर येते आहेत. त्यामुळे सरकारने आमच्या मागण्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

संपावर जाण्याची इच्छा नाही, मात्र...
गेल्या दोन वर्षांपासून आम्ही या मागण्या करत असल्याचे वैद्यकीय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष डॉ. सचिन मूलकुटकर यांनी सांगितले. परंतू अद्याप सरकारने पावले उचलली नाहीत. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनीही मागणी पूर्ण करण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याबाबत आश्वासन दिले आहे. या संदर्भात सुप्रिया सुळे यांच्याशीही चर्चा झाली. आम्ही बुधवारी भेटणार आहोत. पुढे काय करावे याबद्दल चर्चा होईल. आम्हाला संपावर जाण्याची इच्छा नाही. मात्र आमच्या मागण्या पुर्ण न झाल्यास कठोर पावले उचलावी लागतील, असा इशारा मूलकुटकर यांनी दिला. 

मी गेल्या 4 वर्षांपासून जेजे रुग्णालयात बालरोग शल्यचिकित्सा विभागात काम करत आहे. सध्या माझ्या शिक्षणाचा आणि अनुभवाचा विचार करता मला खासगी रुग्णालयात महिना तीन लाख रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. तशी विचारणादेखील अनेक रुग्णालयातून होत आहे. परंतू, जेजे रुग्णालयात कमी पैशात माझे शिक्षण झाल्यामुळे समाजाची बांधिलकी म्हणून मी जेजे रुग्णालयातच काम करण्याचा निर्णय घेतला आणि मागील 4 वर्षांपासून याठिकाणी काम करत आहे; मात्र इतकी वर्षे काम करूनदेखील मी कंत्राटी पदावर काम करत आहे. आतातरी शासनाने आमची बाब गांभीर्याने घ्यावी आणि आम्हाला सेवेत कायम करून घ्यावे. 
- डॉ. नताशा बगेरिया, बालरोग शल्यचिकित्सक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE Three Language Policy : सीबीएसईच्या सहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! त्रि-भाषा धोरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; काय दिले निर्देश?

Alegaon Murum Mining: आळेगाव पागा मुरूम उत्खनन प्रकरण: पंचनाम्यातील आकडे संशयास्पद, पर्यावरणप्रेमींची सखोल चौकशीची मागणी

Pitru Paksha 2026 : पितृपक्षात श्राद्धाचं जेवण कसं असावं? शास्त्रानुसार काय वाढावं आणि काय टाळावं जाणून घ्या

Mumbai Indians ने कर्णधारासह ११ खेळाडूंना केलं रिटेन! फ्रँचायझीने संघाबाहेर केलेल्यांची यादीच जाहीर केली

DCM Sunetra Pawar : बारामती बँकेने कार्यक्षेत्र विस्तारुन आर्थिक सहाय्य करावे

SCROLL FOR NEXT