'ती' बंद करायला विसरली; अन् त्याने... 
मुंबई

'ती' बंद करायला विसरली; अन् त्याने...

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : एका तरुणीच्या जीमेलच्या माध्यमातून परिचयातील व्यक्तीने, तिचे स्नॅप चॅट हॅक करून खासगी फोटो व व्हिडीओ डाऊनलोड केल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत संबंधित तरुणीने वेळीच पोलिसांत तक्रार केल्याने तिचे खासगी फोटो व व्हिडीओ समाज माध्यमावर प्रसारित होण्यापासून वाचले आहे. अशा प्रकारच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सोशल नेटवर्किंग साईटचा वापर करताना प्रत्येक व्यक्तीने काळजी घेणे आवश्‍यक आहे, असे आवाहन नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून करण्यात आले आहे. 

पीडित तरुणी महाविद्यालयीन विद्यार्थिनी असून काही महिन्यांपूर्वी तिच्या ओळखीतल्या व्यक्तीच्या लॅपटॉपचा तिने आपल्या कामासाठी वापर केला होता. त्या वेळी या व्यक्तीच्या लॅपटॉपवर आपले जीमेल अकाऊंट लॉगईन केले होते; मात्र काम संपल्यानंतर तिने लॉगआऊट केले नव्हते. त्यामुळे त्या व्यक्तीने याचा गैरफायदा घेत तरुणीच्या स्नॅप चॅट खात्याचा पासवर्ड बदलला. त्यानंतर त्याने तरुणीच्या स्नॅप चॅटमध्ये एक्‍सेस मिळवून तरुणीचे खासगी फोटो व व्हिडीओ डाऊनलोड केले. यानंतर आपले स्नॅपचॅट कुणी तरी हॅक केल्याचा तरुणीला संशय आल्याने तिने नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार केली. त्यानुसार सायबर सेलने तांत्रिक तपासाद्वारे शोध घेतला असता पीडित तरुणीच्या परिचयातील व्यक्तीनेच तीचे खासगी फोटो व व्हिडीओ डाऊनलोड केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. 

अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे सोशल नेटवर्किंग साईटचा वापर करताना प्रत्येक व्यक्तीने काळजी घ्यावी. तसेच कॉम्प्युटर, लॅपटॉप किंवा मोबाईलवर सोशल नेटवर्किंग साईट व ई-मेल लॉग इन केल्यानंतर ते न विसरता लॉग आऊट करणे अत्यंत गरजेचे आहे. 
- प्रवीणकुमार पाटील, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain: पुणे जिल्ह्यातील १३ गावांचा संपर्क तुटला... मुसळधार पावसाचा परिणाम, स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण!

Pune-Bengaluru Highway : पुणे-बंगळूर महामार्गावरील उडतरे उड्डाणपुलावरचा रस्ता गेला वाहून; कोट्यवधींच्या कामाची पावसाने केली पोलखोल, वाहनधारकांकडून तीव्र संताप

Latest Marathi News Update: कळमोडी धरण १०० टक्के भरलं, विसर्गामुळे चासकमानच्या पाणीसाठ्यात वेगानं वाढ

FIFA WORLD CUP: वर्ल्डकप स्पर्धेत डोनाल्ड ट्रम्प यांचा हस्तक्षेप; अमेरिकेचा हुकमी खेळाडू बालोगुनचे ‘रेड कार्ड’ फिफाकडून तात्पुरते रद्द

IND vs ENG: वेगवान गोलंदाजाचा समावेश निश्चित; बिश्नोईला डच्चू मिळण्याची शक्यता; भारत-इंग्लंड आज लढत

SCROLL FOR NEXT