मुंबई

सोने खरेदी रोडावली, आहे खास कारण...वाचा सविस्तर 

शर्मिला वाळुंज

ठाणे : दिवाळी संपताच लग्नसराईचा हंगामही सुरू होतो. या काळात कपडे, सोनेखरेदीला जोर येतो. त्यातच सोने पेढीत-सराफा बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढते. यंदा मात्र सोन्याच्या दराने चाळिशी पार केल्याने ग्राहकांची संख्या रोडावल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसत आहे. सोन्याचा दर 41 हजारांच्या घरात गेल्याने ग्राहकांनी हात आखडताच घेतला आहे. पौष महिना संपेपर्यंत सोन्याच्या दरात काही प्रमाणात का होईना घसरण होईल, ही आशा करून नंतरच सोने खरेदी करण्याकडे अनेकांचा कल आहे. त्यामुळेच सोने पेढीत शुकशुकाट दिसून येत आहे. 

आर्थिक मंदी, महागाई यामुळे आर्थिक घडी विसकटली असताना अमेरिका-इराणमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन आणि सोन्याच्या दरातही मोठी वाढ होत आहे. सोन्याचे दर गेल्या काही महिन्यांपासून चढेच आहेत. लग्नसराईच्या दिवसांत, साडेतीन मुहूर्ताला मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी होते.

पौष महिन्यात शुभकार्य करू नये असा अनेकांचा समज असल्याने या दिवसांत लग्नही नसतात. तसेच शुभकार्याची कोणतीही खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल नसतो. पौष महिना सुरू आहेच, त्यात आता सोन्याच्या दरात वाढ झाल्याने ग्राहक पौष महिना संपण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

सोन्याच्या दरात घट होणार नसली, तरी काही प्रमाणात का होईना, दर खाली येतील अशी आशा सर्वसामान्य ग्राहकांना आहे. अनेक ग्राहकांनी त्यांच्या विश्‍वासातील सराफांना 24 जानेवारीनंतर खरेदीसाठी येणार असल्याचे सांगितले आहे. 

सध्या सोन्याचे दर चाळिशीपार गेले आहेत. लग्नसराई सुरू असल्याने अनेकांनी आधीच ऑर्डर देऊन ठेवली आहे. अनेकांनी लग्नाची तारीख सांगून पौष महिना संपल्यानंतर खरेदीला येणार असल्याचे सांगितले. नेहमीप्रमाणे नवनवीन डिझाईनची मागणी होत असली, तरी ग्राहकांची संख्याही रोडावली आहे. 
- महावीर बाफना, सराफ 

पौष महिन्यातही काही ग्राहक खरेदीसाठी येतात, परंतु त्यांची संख्या तुलनेने कमीच असते. त्यात सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरल्याने अनेक जण आजचा भाव काय आहे, अशी विचारणा करून नंतर काढता पाय घेतात. मंदी आणि वाढीव दराने नफ्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. 
- जतीन जोशी, सराफ 

माझ्या मुलीचे लग्न एप्रिल महिन्यात आहे. सोन्याचा भाव 40 हजारांच्या पुढे गेल्याने आम्ही सध्या तरी सोनेखरेदीचा विचार केलेला नाही. सोन्याचे दर कमी होतील अशी आशा आहे. अंदाज घेऊनच खरेदी करणार आहोत. 
- गायत्री प्रधान, ग्राहक. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rain Update: भीषण घटना! क्रिकेटच्या मैदानावर वीज कोसळली; एका खेळाडूचा मृत्यू, अनेक जखमी, मान्सूनचा कहर

Pune Bus Accident : इलेक्ट्रिक 'शिवाई' बसची अनेक गाड्यांना धडक, घटनास्थळावरचा VIDEO आला समोर

देऊळ बंद २ ने राजा शिवाजी सिनेमाचाही रेकॉर्ड मोडला, आतापर्यंत कमावले तब्बल इतके कोटी

Thane News: अंबरनाथ शिवमंदिर परिसरातील आरक्षणाविरोधात विहिंप-बजरंग दल आक्रमक, बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा

Latest Marathi News Live Update : भारत-इस्रायल संरक्षण सहकार्याला नवी गती; राजनाथ सिंह-आमीर बाराम यांची भेट

SCROLL FOR NEXT