मुंबई

बल्ले बल्ले करत व्यक्त केला आनंद, 106 वर्षीय आजींनी कोरोनाला हरवले

मिलिंद तांबे

मुंबई, ता.20 : मुंबईसह राज्यात कोरोनाची दहशत कायम असतांना एका 106 वर्षांच्या आजीने कोरोनावर यशस्वी मात केली. कोरोनातून बरे झाल्यावर आपल्या घरी परतल्यानंतर या अजीबाईंनी चक्क बल्ले बल्ले करत आपला आनंद व्यक्त केला.

डोंबिवलीतील आनंदीबाई पाटील या 106 वर्षीच्या वयोवृद्ध आजीला कोरोनाची बाधा झाली. मात्र त्यांच्या वयामुळे अनेक रुग्णालयांनी त्यांना दाखल करून घेण्यास नकार दिला. परंतु डोंबिवली येथील सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील,  कोविड समर्पित रुग्णालयातील डॉ. राहुल घुले यांनी त्यांना तिथे दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू केले. आज त्या उपचाराअंती कोरोनामुक्त झाल्या आहेत.

आजींचे वय जास्त असल्याने त्यांची विशेष काळजी घेण्यात आली. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजन, मधुमेह तसेच रक्तदाब तपासून यावर लक्ष ठेवण्यात आले. मात्र यातून बरे झाल्यानंतर आजींना आज सावळाराम महाराज म्हात्रे कोविड समर्पित रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. कोविड-19 चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी अथकपणे काम करणारे महापालिका प्रशासन, डॉ. राहुल घुले यांच्यावर आता सर्वच स्तरातुन अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होतोय.

कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण नागरिकांमध्ये पसरले असताना 106 वर्षाच्या वयोवृद्ध महिलेस कोरोनामुक्त होऊन डिस्चार्ज मिळणे ही अत्यंत सकारात्मक आणि समाधान कारक बाब आहे.

पर्यावरण मंत्री  आदित्य ठाकरे यांनी देखील ट्विट करून महापालिका प्रशासन व डॉ.राहुल घुले यांचे कौतुक केले आहे.

good news 106 years old lady from dombivali recovered from corona

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT