मुंबई

BMC कर्मचाऱ्यांसाठी गोड बातमी! महापौरांनी जाहीर केला दिवाळी बोनस

तुषार सोनवणे

मुंबई : दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशात सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसचे वेध लागले आहेत. यंदा कोरोनामुळे मोठं नुकसान झालंय. अशा खालावलेल्या आर्थिक परिस्थितीत कर्मचाऱ्यांनी दिवाळी बोनसची अपेक्षा ठेवावी की ठेवू नये हा देखील प्रश्न अनेकांसमोर उपस्थित झालाय. यापार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी 15 हजार 500 रुपयांचा बोनस जाहीर केला आहे.    

मुंबई महापालिका कामगार कर्मचाऱ्यांचा बोनसचा तिढा सुटला आहे. महापौर किशोरी पेडणेकर सोमवारी सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. कर्मचारी कामगारांच्या समन्वय समितीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी बोनससाठी सानुग्रह अनुदान देण्याचे आश्वासन दिले होते..

मुंबई महागरपालिका कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतूदीनुसार 17 हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळणार होते. मात्र,कोविड काळात कर्मचार्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेऊन 40 हजार रुपयांपर्यंत सानुग्रह अनुदान मिळावा अशी मागणी समन्वय समितीने केली होती.

तरतुदींपेक्षा जास्त अनुदान द्यायचे झाल्यास मुख्यमंत्र्यांची परवानगी घ्यावी लागेल असे आयुक्त इक्बाल सिह चहल यांनी सांगितले होते. त्यावर समन्वय समितीचे अध्यक्ष बाबा कदम निमंत्रक ऍडव्होकेट प्रकाश देवदास यांच्यासह शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावर सोमवारी महापौर अनुदान जाहीर करतील असे आश्वासन मुखमंत्र्यांनी दिले होते. त्याप्रमाने मुंबई महानगर पालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी 15 हजार 500 रुपयांचा बोनस महापौर किशोरी पेडणेकर यांनी जाहीर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar Crime : पत्नी-पतीचा वाद; अकरावर्षीय मुलाला पळविले, पतीसह त्याच्या तीन मित्रांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : भाजपने अजितदादांवरील आरोप विनाअट मागे घ्यावे - संजय राऊत

Software Engineer Cyber Crime Scam : सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणी ठरली सायबर फसवणुकीची शिकार; 50 लाखाला फसविले, मैत्रिणीलाही ओढले जाळ्यात

Chhatrapati Sambhajinagar Crime : तू मेरी नहीं तो किसी और की भी नहीं...

Gold Rate Today : सोनं-चांदी कोसळली! जानेवारीत पहिल्यांदाच एवढी मोठी घसरण, पाहा आजचे भाव

SCROLL FOR NEXT