Share-Market 
मुंबई

Share Market: सेन्सेक्सचा आलेख वर; 49 हजारांपार मजल

जाणून घ्या सोन्या-चांदीचे दर एका क्लिकवर

कृष्णा जोशी

जाणून घ्या सोन्या-चांदीचे दर एका क्लिकवर

मुंबई: मागील सलग चार दिवसांच्या घसरणीनंतर भारतीय निर्देशांकांने (Share Market) आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी वाढ दाखवली. शेअर बाजारात ही सलग तिसऱ्या दिवशीची वाढ आहे. आज 256 अंशांनी वाढलेला सेन्सेक्स (Sensex) 49 हजार 206 अंशांवर बंद झाला. निफ्टीदेखील (Nifty) 98 अंशांनी वाढून 14 हजार 823 अंशांवर स्थिरावला. आज सेन्सेक्समधील 30 प्रमुख समभागांपैकी 24 समभागांचे (Shares) दर वाढले तर सहा समभागांचे दर घसरले. (Good News in Share Market as Sensex Crosses 49 Thousand Mark)

HDFC, महिंद्रा आणि महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह, NTPC या समभागांचे दर दोन टक्क्यांच्या आसपास वाढले. तर एअरटेल, ITC, हिंदुस्थान युनिलीव्हर यांचे दरही सुमारे एक टक्का वाढले. बजाज ऑटो, बजाज फायनान्स, इन्फोसिस, कोटक बँक यांचे दर घटले. काल ONGC, बजाज फायनान्स एक-दोन टक्के वाढले होते तर TCS, स्टेट बँक, कोटक बँक, नेस्ले, टेक महिंद्र, हिंदुस्थान युनिलिव्हर, एशियन पेंट यांचे दर किरकोळ वाढले होते. डॉ. रेड्डी, रिलायन्स, सनफार्मा दोन टक्क्यांपर्यंत घसरले. HDFC व HDFC बँक, इन्फोसीस, ITC, महिंद्रा आणि महिंद्रा हे समभागही दीड टक्क्यांच्या आसपास घसरले होते.

आजचे सोन्या-चांदीचे दर

सोने (10 ग्रॅम) - 45,800 रु.

चांदी (1 किलो) - 71,600 रु.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT