मुंबई

मुंबईकरांसाठी खुशखबर! बेस्ट बसेस पुर्ण क्षमतेने चालवण्यास राज्य सरकारने परवानगी

समीर सुर्वे

मुंबई : बेस्ट मध्ये होत असलेली प्रवाशांची कोंडी आता फुटणार आहे. बसेस पुर्ण क्षमतेने चालवण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. मात्र, त्यासाठी नियमावली तयार केली असून त्या नियमावलीचे पालन प्रवाशी आणि बेस्ट प्रशासनालाही करावे लागणार आहे. यात प्रवाशांना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे.

मुंबईत आजही बेस्ट निम्म्या क्षमतेने धावत आहे. एका आसनावर फक्त एकच बसण्याची परवानगी असून उभ्याने प्रवास करण्यावरही मर्यादा आहे. त्यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा होत आहे. तसेच, बस वाहाकालाही अनेक वेळा प्रवाशां बरोबरच हुज्जत घालावी लागत होती. बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर यांना पत्र पाठवून बेस्ट बसेस पुर्ण क्षमतेने चालविण्याची परवानगी मागितली होती. त्या पत्रावर राज्य सरकारने आज बेस्टला परवानगी दिली आहे.

बेस्टच्या दिमतीला सध्या एसटीच्या बसेसही मुंबईत धावत आहे. राज्य परीवहन सेवेला राज्य सरकारने पुर्ण क्षमतेने प्रवासी वाहून नेण्याची परवानगी यापुर्वीच दिली आहे. त्यामुळे मुंबईत धावणाऱ्या एसटीच्या गाड्यांमध्ये प्रवासी पुर्ण क्षमतेने भरलेले असतात. तर,बेस्टच्या बसेस मध्ये निम्म्या क्षमतेने प्रवासी असतात. अशी तफावत गेल्या महिन्या भरापासून सुरु आहे.

राज्य सरकारने ही परवानगी देताना प्रवाशांना मास्क आणि सॅनिटायझराचा वापर करणे बंधनकारक केले आहे. तर, बेस्ट प्रशासनाला बसेसचे नियमीत सॅनिटायझेशन करायचे आहे.

-----------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest Shivaji Park : अभिजित दिपके मुंबई पोलिसांच्या रडारवर? शिवाजी पार्कवरील आंदोलन बेकायदेशीर?; CJPच्या चार पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

Latest Marathi News Live Update : दिवसभरात काय घडलं? देशविदेशातील घडामोडी वाचा एका क्लिकवर

MPSC Student Agitation Issue : एमपीएससी आंदोलनातील फूट; शिष्टमंडळाच्या परस्पर निर्णयाने विद्यार्थ्यांमध्ये संताप

Gangapur News : गंगापूर तालुक्यात खरीप हंगामच्या पंचनाम्याला वेग; दोन दिवसात १६ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्राचा पंचनामा पूर्ण

Satara District Bank Election : भाजप, राष्ट्रवादीने वाढवले उंडाळकरांचे टेन्शन! बाळासाहेब पाटलांसह भाजपचे तीन दिग्गज मैदानात; उमेदवारीचा दावेदार कोण याचीच उत्सुकता

SCROLL FOR NEXT