taj and gate way 
मुंबई

मुंबईकरांनो संकटाच्या काळात तुमच्यासाठी आनंदाची बातमी; कोरोना रुग्ण....

सकाळ वृत्तसेवा

मुंबई- महाराष्ट्र गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून एकामागोमाग एका संकटाचा सामना करत आहेत. एकीकडे कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत असताना राज्यासमोर निसर्ग चक्रीवादळासारखं संकट समोर होतं. त्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा मुंबईत सर्वाधिक आहे. दिवसेंदिवस या कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढतानाच दिसतोय. आज मुंबईत निसर्ग चक्रीवादळ धडकलं.  या संकटसमयी मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबईत रुग्णदुपटीचा वेग 19 दिवसांवर गेला असल्याची माहिती मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी सांगितलं. 

या बैठकीत कोरोनावरील उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत खाटा आणि इतर साधन सामग्रीची कशापद्धतीनं वाढ करण्यात याची माहिती यावेळी आयुक्तांनी दिली. तसंच कोरोनाचं संक्रमण रोखण्यात आपल्याला कसं यश मिळत आहे याविषयीही त्यांनी सांगितले.

प्रत्येक खाटेला युनिक आयडी देण्यात येणार असून डायलिसीस रुग्णांना यापुढे उपचार मिळणार असल्याच त्यांनी म्हटलं. प्रयोगशाळांना 24 तासांत चाचणी अहवाल देणे बंधनकारक करणार असल्याचं चहल यांनी स्पष्ट केलं. 3,750 डॉक्टर सध्या कोरोनावर उपचार करताहेत. 450 डॉक्टर्सपैकी 60 जणांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. मुंबईत सध्या 21 हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, असेही त्यांनी सांगितले.  

सध्याच्या परिस्थितीत एकूण रुग्णसंख्येच्या 35.23 टक्के रुग्ण महाराष्ट्रात आढळत आहेत. राज्यात मृत्यूदर 3.37 टक्के असून देशाचा मृत्यूदर 2.82 टक्के आहे. मुंबईमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 41.33 टक्के, तर ठाण्यात 36.59 टक्के आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 4.5 लाख चाचण्या झाल्या आहेत.

मुंबईतलं मृत्यू प्रमाण घटलं:

मुंबईतील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण सरासरी 3.2 टक्के आहे. तर बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सरासरी 46 टक्के आहे. मुंबईमधील कोरोनाबाधितांची संख्या 30 मे 2020 पर्यंत 38 हजार 220 इतकी होती. त्यापैकी आतापर्यंत 16 हजार 364 रुग्ण बरे झालेत. त्यांना आता  रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलं आहे. तर एक हजार 227 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये विविध दीर्घकालीन आजार असलेल्यांची संख्या मोठी असल्याचे निदर्शनास आले आहे.

हॉटस्पॉटमध्ये रुग्णसंख्यावाढीचा दर मंदावला:

मुंबईतील हॉटस्पॉटमध्ये रुग्णसंख्यावाढीचा दर मंदावला. मुंबईच्या चार वॉर्डमध्ये रुग्णसंख्या वाढीचा दर 8% पेक्षा जास्त आहे.  वरळी, धारावीत रुग्णसंख्या वाढीचा वेग मंदावला चित्र सध्या पाहायला मिळतंय. मुंबई महापालिकेच्या 27 मे रोजीच्या अहवालानुसार पालिकेच्या दादर जी-उत्तर, भायखळा ई विभाग, माटुंगा एफ-उत्तर, अंधेरी के-पश्चिम सांताक्रुज एच-पूर्व आणि कुर्ला एल विभाग या सहा विभागांत दोन हजारापेक्षा जास्त कोरोना रुग्ण सापडले. तर आता धारावीचा समावेश असलेल्या जी नॉर्थमध्ये रुग्णसंख्या वाढीचा दर 3.6% आहे. वडाळा, सायन विभागाचा समावेश असलेल्या एफ नॉर्थ मध्येही 3.6% इतका आहे.

good news for mumbaikars at this tensed situation read full news 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पेट्रोल-डिझेल दरवाढ, तुटवड्याने शेतकरी अडचणीत; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जागतिक संकट अन् मागणीही वाढलीय

MI vs RR: आधी आऊट, मग नो बॉल अन् चौकार... जडेजाने शार्दुल ठाकूरची भर मैदानात उडवली खिल्ली! Video होतोय Viral

विधानपरिषदेआधी काँग्रेसला धक्का? ७० नगरसेवक नॉट रिचेबल; राज्यात खळबळ

Jio New Recharge : जिओची धमाकेदार ऑफर! 'या' रिचार्जमध्ये मिळणार Netflix-Amazon सारखे 15 OTT ॲप्स; तसेच 5GB डेटासुद्धा

World Thyroid Day 2026: अचानक शरीरात बदल जाणवत आहेत? थायरॉईडमुळे होणाऱ्या समस्या आणि त्यावरील सोपे उपचार समजून घ्या

SCROLL FOR NEXT