मुंबई

कोरोनाच्या थैमानात वरळी कोळीवाड्यातून आली 'ही' गुडन्यूज! वाचा बातमी सविस्तर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : वरळी कोळीवाडा परीसरातून गेल्या आठवडा भरात एकही रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे या परीसरावरील निर्बंध उठवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तब्बल महिन्या भरापेक्षा अधिक  काळाने हे निर्बंध हटविण्यात येणार आहेत.

29 मार्च रोजी या परीसरातून एकाच वेळी 4 रुग्ण आढळले होते. दाटीवाटीची ही वस्ती महापालिकेने तत्कळ सिल केली. या परीसरात आता पर्यंत 90 च्या आसपास रुग्ण आढळले होते.त्यातील 53 जणं कोरोनातून मुक्त झाले आहेत.  कोळीवाड्या बरोबरच शेजारच्या जिजामाता नगर आणि जनता कॉलनीतही रुग्ण आढळल्याने हा परीसरही पालिकेने सिल केला होता. कोळीवाड्याची लोकसंख्या 42 हजार तर जिजामाता नगर जनता कॉलनीची लोकसंख्या 35 हजाराच्या आसपास आहे. या परीसरातील 700 हायरिस्क लो रिस्क व्यक्तींना महापालिकेने सार्वजनिक केंद्रात क्वारंटाईन केले होते.

गेल्या आठवडा भरात या परीसरातून एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे या परीसरातील निर्बध हटविण्याच्या सुचना पोलिसांना करण्यात आल्या आहेत.असे पालिकेकडून सांगण्यात आले. 

वरळी परीसरातील 11 प्रतिबंधित क्षेत्रांवरील निर्बंध हटविण्यात आले आहेत.मात्र,वरळी बीडीडी चाळ आणि ना.म.जोशी मार्ग बीडीडी चाळीच्या वसाहती पालिकेने पुढील 8 दिवसांसाठी सिल केल्या आहेेेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi : वैभवसाठी संजू सॅमसनला बळीचा बकरा का बनवताय? माजी खेळाडूचा संतापजनक सवाल...

ऑफिसमध्ये एकाला थंडी तर दुसऱ्याला घाम का येतो? वाचा सेंट्रल एसीच्या या परिस्थितीमागचं खरं कारण

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहिणींनो लक्ष द्या! तुमच्या बँक खात्यात 1500 ऐवजी जमा होणार 3,000 रुपये? पण 'या' 80 लाख महिलांना बसू शकतो फटका!

आगीत काय जळालं ते राखेलाच माहीत! ‘बोल बोल राणी’च्या ट्रेलरवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट, चित्रपटात सईच्या तीन भूमिका?

Latest Marathi News Live Update : सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या भीमाशंकर पट्ट्यात अजूनही मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम

SCROLL FOR NEXT