मुंबई

फालतू मेसेजेसला असा बसणार आळा; गुगल आणणार सर्वात मोठी अपडेट

सकाळ वृत्तसेवा

तुम्हाला सारखे बिनकामाचे मेसेज येतायत. कोणता मेसेज खरा कोणता मेसेज खोटा हे समजत नाही ? आता चिंता नाही. कारण गुगल तुम्हाला आता याबाबत अलर्ट करणार आहे. गुगल एक भन्नाट अपडेट लवकरच घेऊन येणार आहे.  त्यामुळे तुमची चिंता कमी होणार आहे.   

गुगल आपल्या मेसेंजर म्हणजेच गुगल मेसेज (Google Android Messages) साठी लवकरच एक मोठं फिचर सुरु करणार आहे. असं मानलं जातंय आतापर्यंतचं हे सर्वात मोठं आणि महत्त्वाचं फिचर असणार आहे. नवीन फिचर नंतर गुगल मेसेजमध्ये व्हेरीफाईड  मेसेज आणि स्पॅम प्रोटेक्शन मिळणार आहे. गुगल मेसेज जवळ जवळ सर्व Android फोनमध्ये आधीपासूनच उपलब्ध आहे.

आता नवीन अपडेट नंतर तुम्हाला कोणताही मेसेज आला तर तो व्हेरीफाईड नंबरवरून आलेला असेल. यावरून तुम्हाला कोणता मेसेज खरा आणि कोणता खोटा हे चटकन समजणार आहे. जर तुम्हाला कोणता बँकेचा मेसेज आला तर तो व्हेरीफाईड असेल. त्या सोबत त्या बँकेचा फोटो आणि व्हेरिफिकेशन टिक देखील असणार आहे.  

गुगल मेसेजमध्ये व्हेरीफाईड SMS चं फिचर सर्वात आधी भारत, अमेरिका, मेक्सिको, ब्राझील, ब्रिटन, फिलिपिन्स, स्पेन आणि कॅनडामध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. मात्र गुगल हे फिचर कधी लॉन्च करणार हे  मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. 

व्हेरीफाईड मेसेज व्यतिरिक्त, गुगल मेसेजमध्ये 'स्पॅम प्रोटेक्शन'चं हे देखील मोठं फिचर उपलब्ध होणार आहे. या अपडेट नंतर तुमच्या मोबाईलमध्ये कोणताही स्पॅम मेसेज आला तर तुम्हाला अलर्ट मिळणार आहे. उदाहरणार्थ स्पॅम मेसेज आल्यावर गुगल तुम्हाला Report Spam  किंवा Report Not Spam  असा विकल्प देणार आहे.   

WebTitle : google to update their google message app with verification and spam protection 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways : पुणे, मुंबई, कोल्हापूरहून धावणाऱ्या 8 एक्स्प्रेस गाड्यांना जानेवारी 2026 पासून मिळणार 'LHB' डबे

Ravindra Jadeja: एमएस धोनीची जडेजासोबत राजस्थानमध्ये ट्रेड होण्यापूर्वी नेमकी काय चर्चा झाली? समोर आली अपडेट

Mumbai Crime: मध्यरात्री फिरताना २७ वर्षीय फ्रेंच तरुणीसोबत तरूणानं नको ते कृत्य केलं अन्...; मुंबईत नेमकं काय घडलं?

VIP Mobile Number Process : घरबसल्या तुम्हाला मिळेल VIP मोबाईल नंबर; 10 मिनिटात कन्फर्म फ्री रजिस्ट्रेशन, सीक्रेट ट्रिक पाहा

डिझेल टँकरला बस धडकली, मदिनाला निघालेले हैदराबादचे ४२ यात्रेकरू होरपळले, फक्त बसचा ड्रायव्हर वाचला

SCROLL FOR NEXT