मुंबई

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकेत; मुंबई दिल्ली मुंबई रेल्वे सेवा आणि विमान सेवा बंद ?

सुमित बागुल

मुंबई : दिवाळीमध्ये विविध बाजारपेठांमध्ये झालेल्या तोबा गर्दीचे परिणाम आता दिसायला सुरवात झालीये. गेले काही दिवस अगदी पाचशेच्या खाली आलेली कोरोना रुग्णसंख्या आता झपाट्याने वाढताना  पाहायला मिळतेय. काल पुन्हा एकदा मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा ९०० पार गेलाय. तर दिल्लीत कोरोनाचा कहर पाहायला मिळतोय. या धर्तीवर आता राज्याकडून महत्त्वाचे निर्बंध लादले जाण्याची  शक्यता आहे. केवळ मुंबईतच नव्हे तर राज्यात आणि देशात अनेक ठिकाणी हीच स्थिती आहे. दिल्लीची वाटचाल पुन्हा एका लॉकडाऊनच्या दिशेने आहे. अशात महाराष्ट्र राज्य सरकारकडून काही कठोर पावले पुन्हा उचलली जाण्याची शक्यता आहे 

एकीकडे दिवाळीत झालेली भयावह गर्दी आणि दुरीकडे देशात सुरु होणारी थंडी यामुळे मुंबईसह राज्यात तसेच देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून मुंबई-दिल्ली-मुंबई विमान सेवा आणि रेल्वे सेवा बंद करण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र शासन तसा विचार करत असल्याचं समजतंय. त्यामुळे कोरोनाला आळा घालण्यासाठी, करोनाचा वाढता प्रसार अंडी धोका नजरेत ठेऊन महाराष्ट्र राज्य सरकार दिल्ली-मुंबई-दिल्ली विमानसेवा तसेस रेल्वे सेवा बंद करण्याची शक्यता आहे.

पाचशेच्या खाली आलेला आकडा पुन्हा गेला नऊशेवर

दिवाळीदरम्यान बाजारांमध्ये, खरेदीसाठी झालेल्या गर्दीचा पारिणाम आता कोरोना रुग्णसंख्येत झालेल्या वाढीच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. केवळ मुंबईतच नव्हे तर इतर मोठ्या शहरांमध्ये देखील हीच स्थिती आहे. मुंबईत काल कोरोनाचे 924 नवे रुग्ण सापडले असून मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 2,72,449 झाली आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची हीच रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांपूर्वी पाचशेच्या खाली आलेली होती. मात्र काल मुंबईत 924 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे.

government is planning suspend railways and domestic air service between mumbai and delhi

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Tiger: उद्धव ठाकरेंचे 'हे' सहा खासदार दिल्लीत दाखल?, शिंदे दिल्लीकडे रवाना, उद्या लोकसभा अध्यक्षांची होणार भेट?

Pune News : नाट्यगृहाच्या आरक्षणासाठी ॲप अनिवार्य करणार; स्थायी समितीचा निर्णय

Vantara Confirms Madhuri Elephant Return Kolhapur : 'कोल्हापूरकर आम्ही माधुरी हत्तीला पाठवतोय'; वनताराने अखेर दिली कबुली; व्हिडिओ केला सादर

Uruli Kanchan Blood Donation : उरुळी कांचनमध्ये ड्रीम्स युवा फाउंडेशनचे विक्रमी ८०६ पिशव्या रक्तदान

Privatization of Schools : बहुमताच्या जोरावर शाळांच्या खासगीकरणाचा प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT