मुंबई

३१ बंगल्यांवर १५ कोटींचा खर्च; "बंगल्यावर खर्च करता मग शेतकऱ्यांना का पैसे देत नाही?" : फडणवीस 

सुमित बागुल

मुंबई : एकीकडे कोरोनामुळे सरकारी तिजोरीत खडखडाट असताना राज्यातील मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केल्याची बाब समोर येतेय. सार्वजनिक बांधकाम विभागाने विरोधीपक्षनेत्यांच्या बंगल्यासह ३१ बंगल्यांच्या दुरुस्तीच्या निविदा काढल्यात. मात्र निविदा सादर होण्याआधीच बंगल्यांमधील कामाला सुरवातही झालीये. एका मराठी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार मंत्र्यांच्या एकूण ३१ बंगल्यांवर करोडोंचा खर्च करण्यात आला आहे. एकूण ३१ बंगल्यांवर जवळजवळ १५ कोटींचा खर्च करण्यात  आले आहेत. 

कोणत्या बंगल्यावर किती रुपयांचा खर्च : 

  • बाळासाहेब थोरात त्यांचा रॉयल स्टोन बंगला : खर्च - 1 कोटी 81 लाख
  • छगन भुजबळ यांचा रामटेक बंगला : खर्च - 1 कोटी 48 लाख
  • अशोक चव्हाण यांचा मेघदूत बंगला : खर्च - 1 कोटी 30 लाख
  • राजेंद्र शिनगे यांचा सातपुडा बंगला : खर्च - 1 कोटी 33 लाख
  • नितीन राऊत यांचा पर्णकुटी बंगला : खर्च - 1 कोटी 22 लाख
  • जयंत पाटील यांचा सेवासदन बंगला : खर्च -  1 कोटी 5 लाख
  • शिवनेरी बंगल्यावर 1 कोटी 17 लाख रुपये खर्च 
  • अग्रदूत बंगल्यावर 1 कोटी 22 लाख रुपये खर्च
  • ज्ञानेश्वरी बंगल्यावर 1 कोटी 1 लाख रुपये खर्च 

दरम्यान याबाबत बोलण्यास महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नकार दिलाय. बंगल्यावर किती खर्च केला यावर मी बोलणार नाही. तुम्ही बंगल्यावर खर्च करता मग शेतकऱ्यांना का पैसे देत नाही, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केलाय. 

government spent more than 15 crore on renovation of 31 bungalows reaction of devendra fadanavis 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT