मुंबई

वैद्यकीय चाचण्यांवरील सरकारी दरपत्रकाला हायकोर्टात आव्हान

- सुनीता महामुणकर

मुंबई, ता. 6 : खासगी रुग्णालयांंकडून होत असलेल्या भरमसाठ शुल्क वसुलीला लगाम लावण्यासाठी राज्य सरकारने स्कॅनिंग आणि अन्य संबंधित अद्ययावत चाचण्यांवर लावलेल्या दरपत्रकाला राज्यातील रेडिओलॉजिस्ट संघटनेने याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. 

सरकारने निर्धारित केलेल्या दरपत्रकाबाबत खुलासा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिले आहेत. रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी अनेक चाचण्या कराव्या लागतात. मात्र या चाचण्या करताना रुग्णांकडून जादा शुल्क आकारणी केले जाते, असे विविध तक्रारींद्वारे सांगण्यात आले होते. याची दखल घेऊन राज्य सरकारच्या संबंधित विशेष समितीने अशा संगणीकृत वैद्यकीय चाचण्यांवरील दर निश्चित केले आहेत.

याबाबत सप्टेंबर महिन्यात एक अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये वेगवेगळ्या चाचण्यांंसाठी रु 2000 ते 3000 असे शुल्क निर्धारित केले आहे. मात्र अशी शुल्क आकारणी करणे मनमानी करण्यासारखे आहे, असा दावा केला गेलाय. संबंधित समितीमध्ये कोणीही स्कॅनिंग सेंटरबाबत जाणकार नाही, त्यामुळे या आमची बाजू न ऐकता हा निर्णय घेण्यात आला आहे, असे याचिकादारांचे म्हणणे आहे.

न्या. रवी देशपांडे आणि न्या. पुष्पा गनेडिवाला यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. या दरपत्रकाबाबत राज्य सरकार, केन्द्रीय आरोग्य विभाग, सार्वजनिक आरोग्य सेवा विभाग, नागपूर महापालिकेला न्यायालयाने नोटीस बजावली असून याचिकेतील मुद्यांंवर खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत. याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे.

( संकलन - सुमित बागुल ) 

government tariffs on medical tests challenged in bombay high court

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क

Rekha Jhunjhunwala: रेखा झुनझुनवालांचे एका दिवसात 800 कोटींचे नुकसान; शेअर बाजारात नेमकं काय झालं?

Met Gala 2024 : Met Gala कसा बनला फॅशन जगतातला ऑस्कर ? जाणून घ्या यंदाची थीम अन् इतिहास

UAPA: ओसामा बिन लादेनचे फोटो, ISIS चे झेंडे बाळगणे गुन्हा नाही: हायकोर्ट

SCROLL FOR NEXT