मुंबई

सर्वात मोठी बातमी - कोरोना रुग्णांना उपचार देण्याबाबत झाला 'मोठा' निर्णय...

भाग्यश्री भुवड

मुंबई - कोरोनाविरूद्ध संपूर्ण जग लढतयं. मात्र या आजारावर अद्याप कुठल्याही प्रकारचे औषध तयार झालेले नाही. त्यामुळे विषाणूवर मात करायची असल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं हा एकच पर्याय आहे. यासाठी आता सरकारने कोरोना रुग्णांवर होमिओपॅथी व आयुर्वेदिक औषधांद्वारे उपचार करण्यास परवानगी दिली आहे.  कोरोना रुग्णांवर पारंपारिक औषधाद्वारे उपचार व्हावेत, यासाठी सरकारला अनेक प्रस्ताव पाठवले गेले होते. या, प्रस्तावाला सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. कोरोना विषाणूने जगभरात प्रचंड थैमान घातले आहे. अनेक लोक या विषाणूच्या जाळ्यात ओढला जाऊ लागले आहेत. देशभरासह आता महाराष्ट्रातही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतेय. 

महाराष्ट्रात जवळपास साठ हजाराहून अधिक रुग्णसंख्या झाली आहे तर मुंबईत जवळपास 36 हजार करोनाचे रुग्ण आढळले आहेत. वाढते रुग्ण लक्षात घेऊन रुग्णालयात खाटा वाढवणे, अतिदक्षता विभागात खाटा तयार ठेवणे, तात्पुरती रुग्णालये उभारणे तसेच दीड लाख लोकांसाठी 15 जून पर्यंत क्वारंटाइन केंद्र उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. कोरोना रुग्णांसाठी सरकार उपाययोजना करत आहे. मात्र, असे असताना या आजारावर उपचार करण्यासाठी प्रभावी औषध तयार झालेले नाही. हे लक्षात घेऊन आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी डॉक्टरांनी व त्यांच्या विविध संघटनांनी कोरोना रुग्णांवर आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी औषधांचा वापर करू देण्याची मागणी सरकारकडे केली होती. 

आयुर्वेदिक व होमिओपॅथी औषधे हे मानवी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करते, असे आयुर्वेद तज्ज्ञांनी म्हटले होते. त्यावर सरकारने वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली. कोरोना रुग्णांना होमिओपॅथी, आयुर्वेदिक व युनानी औषधे देण्याबाबतचा निर्णय ही समिती घेणार होती. त्यानुसार आता या समितीने कोरोना रुग्णांवर होमिओपॅथी, आयुर्वेदिक औषधांचा वापर करण्यास मंजुरी दिली आहे. 

याबाबत माहिती देताना वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने म्हणाले की, “ याबाबतचा निर्णय सरकार दरबारी आहे. लवकरच यावर निर्णय सरकारकडून घेतला जाणार आहे. वरिष्ठ अधिकार्यांशी चर्चा सुरु आहे. आमच्या समितीने याबाबत संबंधित विद्याशाखेच्या तज्ज्ञ डॉक्टरांशी सखोल चर्चा करून होमिओपॅथी, आयुर्वेदिक आणि युनानीची कोणती औषधे रुग्णांना द्यायची हे निश्चित केले आहे. या औषधांमुळे कोरोना प्रतिबंधास मदत होण्याची शक्यता आहे आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी वापरावी असे समितीच्या अहवालात नमूद केले आहे. तसेच ताप, घसा खवखवणे अथवा अन्य लक्षणे आढळल्यास तात्काळ जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधण्यास अहवालात स्पष्ट केले आहे. 

याबाबत होमिओपॅथी डॉ. विद्यासागर उमाळकर म्हणाले की, “एक चांगला निर्णय असून होमिओपॅथी औषधांचा कोरोना रुग्णांमधील प्रतिकारशक्ती वाढण्यास निश्चित मदत होईल. या औषधातील सुक्ष्मातीसुक्ष्म औषधी द्रव्ये मुळातून काम करतात. यातून कोरोना नसलेल्या रुग्णांमधीलही प्रतिकारशक्ती वाढून कोरोनाची लागण होण्याची शक्यता दूरावण्यास मदत होते."

“अर्सेनिक, कॅमकोर आणि सेपीया आदी औषधे वापरल्यास त्याची प्रतिकारशक्ती वाढण्यास निश्चित मदत होईल. होमिओपॅथीच्या या औषधांचा कोरोना रुग्णांना तसेच रुग्ण नसलेल्यांची प्रकृती चांगली ठेवण्यास निश्चित मदत होते”, असे कल्याण येथील डॉ. विद्याधर गांगण यांनी सांगितले. 

‘कल्याण होमिओपॅथी डॉक्टर फाऊंडेशन’च्या माध्यमातून आम्ही कोरोनाची काळजी घेण्यासाठी आतापर्यंत जेवढ्यांना औषधे दिली त्यांची तपशीलवार नोंद ठेवलेली आहे. कोरोना रुग्णांसाठी मदत करणाऱ्या जवळपास सहाशे कार्यकर्त्यांना आम्ही होमिओपॅथीची औषधे दिली असून यातील एकालाही कोरोना झालेला नाही. तसेच करोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांनाही औषधे दिली असून त्यांचीही प्रकृती चांगली असून या सार्या नोंदी तपशीलवार महापालिका व संबंधित यंत्रणेला आम्ही देत आहोत, असे डॉ. विद्याधर गांगण यांनी सांगितले.

government took big decision about giving ayurvedic and homeopathic medicines to covid19 patients

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT