governor of MH and post master
governor of MH and post master  
मुंबई

डाक विभागातील कोरोना बाध‍ितांच्या मदतीसाठी राज्यपालांचा पुढाकार; एक लाख रुपयांची मदत... 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: डाक विभागातील कोरोना बाध‍ित कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी  एक लाख रुपयांची मदत केली. 

राज्याचे मुख्य पोस्ट मास्तर जनरल हर‍िशचंद अग्रवाल यांनी आज राजभवन येथे राज्यपालांकडून एक लाख रुपये रकमेचा धनादेश स्व‍िकारला. यावेळी सहाय्यक पोस्ट मास्तर जनरल श्रीनिवास व्यवहारे हे देखील उपस्थित होते.

मोठी बातमी - मुंबईनंतर आता नवी मुंबईच्या आयुक्तांची तडकाफडकी बदली...
 
डाक विभागातर्फे नोव्हेंबर महिन्यात आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पत्रलेखन स्पर्धेत राज्यपाल कोश्यारी यांना प्रथम क्रमाकांचे 25 हजार रुपयांचे पारितोषिक प्राप्त झाले होते.  

या रकमेत स्वत:चे 75 हजार रुपये जोडून ही रक्कम राज्यपालांनी डाक विभागातील कोरोना बाध‍ित कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र पोस्टल सर्कल वेलफेअर फंडाला दिली.

हेही वाचा: पहिला बांबू...सामनाच्या अग्रलेखातून चीनवर निशाणा 
 
महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंती निमित्त डाक विभागाच्या महाराष्ट्र व गोवा परिमंडळाने “ढाई आखर” पत्रलेखन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत “प्रिय बापू अमर है” या व‍िषयावर आंतरदेश‍िय पत्र प्रवर्गात केलेल्या निबंध लेखनासाठी राज्यपालांना प्रथम क्रमाकाचे पारितोषीक प्राप्त झाले होते.

governor of maharashtra helps corona patients in post department  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Virat Kohli : 'तुमच्यापेक्षा माझा खेळ मी अधिक जाणतो म्हणूनच....' विराट कोहलीने टीकाकारांना दिले उत्तर

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

SCROLL FOR NEXT