मुंबई

प्राध्यापक भरतीसाठी राज्यमंत्र्यांचे राज्यपालांना साकडे 

सकाळवृत्तसेवा

मुंबई - राज्यातील विविध विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या हजारो जागा रिक्‍त असून, त्यामुळे उच्च शिक्षणाचा दर्जा खालावण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या रिक्‍त जागा तत्काळ भरण्यासाठी सरकारला योग्य ते निर्देश देण्यात यावेत, अशी विनंती उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. आपल्याच सरकारमधील एका मंत्र्याने राज्यपालांकडे अशी मागणी केल्याने सरकारमध्येच या प्रश्‍नाबाबत समन्वयाचा अभाव असल्याचे यातून दिसून येत आहे. 

प्राध्यापकांच्या रिक्त जागांमुळे राज्यातील उच्च शिक्षण व संशोधनाचा स्तर म्हणावा तसा उंचावताना दिसून येत नाही. या जागा भरण्यासाठी सरकारकडून वेगाने पावले उचलण्यात येत नसल्याने प्राध्यापक संघटनांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. भरती सुरू करण्यासाठी वारंवार आंदोलने करण्यात आली असतानाही सरकारकडून मात्र याची कोणतीही दखल अद्यापपर्यंत घेण्यात आलेली नाही. 

दरवेळी अधिवेशनात विविध आमदारांकडून प्राध्यापकांच्या रिक्त जागांविषयी प्रश्‍न उपस्थित करण्यात येतो. परंतु दरवेळी त्याचे नेमके उत्तर देणे शक्‍य होत नाही. त्यामुळे राज्यातील विद्यापीठांचे कुलपती म्हणून आपण याप्रश्‍नी स्वत: लक्ष घालून प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्याबाबत शासनान योग्य ते निर्देश द्यावेत, अशी विनंती वायकर यांनी केली आहे. 

सरकारकडून भरतीबाबत उदासीनता 
या संदर्भात राज्यातील विद्यापीठांचे कुलपती म्हणून आपल्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कुलगुरूंच्या बैठकीत मोठ्या प्रमाणात रिक्त असलेल्या प्राध्यापकांच्या जागांबाबत चर्चा करण्यात आली होती. याप्रश्‍नी तत्काळ निर्णय घेण्याचे मुख्यमंत्री व वित्तमंत्री यांनी बैठकीत मान्य केले होते. परंतु त्यानंतर रिक्त जागा भरण्याबाबत राज्य सरकार वेगाने पावले उचलत नसल्याचे दिसून येत असल्याचे वायकर यांनी कुलपतींना लेखी पत्राद्वारे कळविले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT