मुंबई

ब्रिस्कवर एसटी महामंडळ मेहरबान; 1 कोटीचा दंड माफ

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : एसटी महामंडळाने राज्यातील बस स्थानके, कार्यालये आणि बसगाड्यांमधील अस्वच्छतेबद्दल ब्रिस्क या कंत्राटदार कंपनीला सुमारे एक कोटी रुपये दंड ठोठावला होता; परंतु एसटी महामंडळानेच २०१८ मध्ये एका परिपत्रकाद्वारे हा दंड माफ केल्याचे उघड झाले आहे. 

संत गाडगेबाबा स्वच्छता प्रकल्पांतर्गत एसटी कार्यालये, निवासस्थाने, स्थानके आणि बसगाड्यांच्या स्वच्छतेचा प्रकल्प २०१७ मध्ये महामंडळाने हाती घेतला होता. चालक-वाहक विश्रांतीगृहे, स्थानकांतील स्वच्छतागृहांची स्वच्छता करण्यात येणार होती. त्यासाठी ब्रिस्क इंडिया कंपनीला सुमारे साडेचारशे कोटी रुपयांचे कंत्राट दिले होते. मुंबई, नाशिक, अमरावती या विभागांत ब्रिस्क कंपनीने क्रिस्टल कंपनीला उपकंत्राट दिले आहे.

ब्रिस्क कंपनीच्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचे आढळल्यामुळे राज्यातील ३१ विभाग नियंत्रकांनी स्थानिक पातळीवर नियमानुसार सुमारे एक कोटीचा दंड केला; परंतु एसटी महामंडळाने दंडाचा परतावा देण्याचा आदेश काढून कंत्राटदार कंपनीचे हित जपल्याचा आरोप केला जात आहे. 

यासंदर्भातील कागदपत्रे ‘सकाळ’ला मिळाली आहेत. दरम्यान, एसटी महामंडळाचे नियोजन व पणन विभागाचे उपमहाव्यवस्थापक श्रीकांत माईंळीकर यांनी या संदर्भात बोलण्यास नकार दिला. विधिमंडळ अधिवेशनासाठी माहिती गोळा करायची आहे. ब्रिस्कसंदर्भात काही आठवत नाही, असे ते म्हणाले.

एसटी कामगारांच्या पगारासाठी महामंडळाकडे निधी नाही. डिझेल, ऑईलसाठी पैसे नाहीत. असे असताना कंत्राटदार कंपनीला कोटीचा दंड माफ केला जातो.
- सदाशिव शिवणकर, सचिव, राज्य एसटी कामगार संघटना

ब्रिस्क इंडिया कंपनीला फायदा करून देण्यासाठी राज्यस्तरावर कंत्राट काढण्यात आले आहे. फक्त ५० कोटींमध्ये होणाऱ्या कामासाठी ४४७ कोटी रुपये मोजले जाणार आहेत. करारातील तरतुदीप्रमाणे केलेला दंड माफ करण्याच्या प्रकाराची चौकशी करावी.
- मुकेश तिगोटे, सरचिटणीस, एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT