मुंबई

MLC Election Results 2020 : "आमचा संसार सुखात सुरुय, भाजपचा केंद्रात आणि राज्यात घटस्फोट" : सुप्रिया सुळे

सुमित बागुल

मुंबई : महाविकास आघाडीवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी महाराष्ट्रातील सर्व शिक्षक आणि पदवीधरांचे आभार मानते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, अजित पवार आणि जयंत पाटील मार्गदर्शनाखाली या निवडणुका पार पडल्यात. गेल्या एक वर्षात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार चाललं आहे, त्या कामाची आम्हाला आज पोचपावती मिळाली आहे. आम्ही एकत्रित काम केल्याने टीमवर्क झालं, त्यासोबतच गेल्या एक वर्षात आम्ही व होमवर्क केला त्यामुळे आम्ही गेल्या एक वर्षात आणि कोविडच्या काळात केलेल्या कामाची  पोचपावती आम्हाला मिळाली, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. विधानपरिषद पदवीधर आणि शिक्षक निवडणुकांच्या निकालांवर सुप्रिया सुळे यांनी मुंबईत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणालात की, आमचं सरकार दडपशाहीचं सरकार नाही. आमच्या विरोधकांनी आमच्यावर मनमोकळेपणाने टीका टिप्पणी करावी. महाराष्ट्रातील जनतेने आमच्यावर जो विश्वास दाखवलाय त्यामुळे आमची नैतिक जबाबदारी आणि पुढील परफॉर्मन्सची जबाबदारी आणखीन वाढल्याचं देखील सुप्रिया सुळे म्हणालात. 

भाजपचे सर्व सहकारी पक्ष भाजपाला सोडून जातायत. भाजपचा केंद्रात आणि राज्यातही घटस्फोट होतोय. त्यामुळे कुणी आत्मचिंतन करावं हे मी आम्ही सांगणार नाही, मात्र आम्ही तिघे एकत्र आहोत आणि आमचा संसार सुखी आहे, असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्यात.  

Graduate constituency election results 2020 reaction of NCP leader supriya sule
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL 1st Test : एकही चेंडू न खेळता, भारत-श्रीलंकेचे खेळाडू जेवायला गेले! गौतम गंभीरचं डोकं फिरलं; गॉलवर नेमकं काय घडलं?

BJP-MNS आमने सामने, पोलीस ठाण्याबाहेरच चारचाकी फोडून कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपच्या बड्या नेत्यासह ६ जणांविरोधात गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : मुंबईत भारतीय नौदलाचा खलाशी, पत्नी आणि दोन अल्पवयीन मुले मृतावस्थेत आढळली

कैरी घातलेलं कोलंबीचं कालवण, सुकटीची किस्मुर... निवेदिता यांनी सांगितलं कसं असतं त्यांच्याकडचं सारस्वत पद्धतीचं जेवण

चंद्रशेखर बावनकुळेंची भाजपने राष्ट्रीय पातळीवर केली नियुक्ती, सोपवण्यात आली महत्त्वाची जबाबदारी

SCROLL FOR NEXT