मुंबई

लोकल प्रवाशांसाठी खुशखबर ! उद्यापासून मध्य रेल्वे मार्गावर धावणार AC लोकल, जाणून घ्या पूर्ण वेळापत्रक

सुमित बागुल

मुंबई : रेल्वे मंत्रालयाने मध्य रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कल्याण दरम्यान एसी लोकल चालवण्यास मंजुरी दिली आहे. उद्यापासून म्हणजेच १७ तारखेपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण स्थानकापर्यंत AC लोकल धावणार आहे. सोमवार ते शनिवार या दिवशी  मुंबईकरांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे. दरम्यान, लोकलने सध्या ज्यांना प्रवासाची परवानगी आहे, अशाना प्रवाशांना AC लोकलने प्रवास करण्याची परवानगी सध्या असणार आहे. 

मध्य रेल्वेने 30 जानेवारी 2020 पासून ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे ते पनवेल दरम्यान पहिली एसी लोकल सुरू केली होती. तर मेन लाईन आणि हार्बर रेल्वे मार्गावर त्यावेळी एसी लोकल चालवण्याचा विचार करण्यात आला नव्हता. एसी लोकलला प्रवाशांचा प्रतिसाद मिळणार नाही किंवा इतर लोकल फेऱ्या खंडित होण्याची भीती मध्य रेल्वेला होती.

मात्र, मध्य रेल्वेने अखेर मेन लाईनवर आता एसी लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये दिवसभरात दहा फेऱ्यांचा समावेश आहे. 

कसं असेल वेळापत्रक  : 

  1. कुर्ला ते CSMT : वेळ - ०५.४२
  2. CSMT ते डोंबिवली : वेळ - ०६.२३
  3. डोंबिवली ते CSMT : वेळ - ७.४७
  4. CSMT  ते कुर्ला : वेळ - ०९.१२
  5. कुर्ला ते CSMT : वेळ - १६.३६
  6. CSMT  ते कल्याण : वेळ - १७.१२
  7. कल्याण ते  CSMT  : वेळ - १८.५१
  8. CSMT  ते डोंबिवली : वेळ - २०.२२
  9. डोंबिवली ते CSMT : वेळ - २१.५९
  10. CSMT ते कुर्ला : वेळ - २३. २५

आता मध्य रेल्वेमार्गावर धावणाऱ्या वातानुकूलित रेल्वेला कसा प्रतिसाद मिळतो हे  पाहणं महत्त्वाचं असणार आहे. 

green signal by rail ministry AC local trains will run from CSMT to kalyan full time table of AC trains

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT