मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  sakal
मुंबई

Gudi padwa 2023 : एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीने शोभायात्रेत अनोखी रंगत

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : नऊवारी साडी, नाकात नथ, डोक्यावर भरजरी फेटा मराठमोळे वातावरण त्याला झांज लेझीम पथकांची साथ अशा मंगलमय वातावरणात बुधवारी डोंबिवलीतील नववर्ष स्वागत यात्रा निघाली. या स्वागत यात्रेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली. केवळ उपस्थितीच नाही तर स्वागत यात्रेत पायी सहभागी होत त्यांनी मार्गक्रमण केल्याने उपस्थित जनतेची मने त्यांनी जिंकली.

मुख्यमंत्री शिंदे हेच यंदाच्या स्वागतयात्रेचे आकर्षणाचा केंद्रबिंदू होते. यासोबतच अनेक सिने कलाकारांनी देखील शोभायात्रेत आपला सहभाग नोंदविला. यावेळी सैराट फेम आकाश ठोसर याने ढोल वर ठेका धरताच तरुणाईने त्याला डोक्यावर घेत प्रचंड प्रतिसाद दिला. ढोल ताशा पथकांनी सादर केलेल्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी नागरिकांचे लक्ष वेधले होते.

श्री गणेश मंदिर संस्थानच्यावतीने डोंबिवलीत गुढीपाडवा निमित्त शोभायात्रा काढण्यात आली. बुधवारी पहाटे श्री गणेश मंदिरात गणेशाची आरती झाल्यानंतर यात्रेची सुरुवात झाली. पश्चिमेतील भागशाळा मैदान येथे पालखीचे पूजन झाल्यानंतर स्वागत यात्रेस सुरुवात झाली. या स्वागत यात्रेत शहरातील विविध सामाजिक संस्थांनी सहभाग घेतला होता.

डोंबिवली रनर्स, सायकल क्लब, क्षितिज, भरारी संस्था, सिंधूदुर्ग जिल्हा मंडळ यांसारख्या विविध संस्था यात सहभागी झाल्या होत्या. मराठमोळा पेहराव परिधान करत बुलेटवर, घोड्यांवर डोंबिवलीकर स्वार झाले होते. सायकल क्लब, रनर्स यांनी शोभायात्रेत सहभागी होत आरोग्याविषयी जनजागृती केली. पर्यावरण दक्षता मंच, ऊर्जा फाऊंडेशन, हिरकणी यांसारख्या संस्थांनीही पर्यावरण पुरक अशी जनजागृती केली.

वसुधैव कुटूंबकम ही संकल्पना अधोरेखित करणारा चित्ररथ यावेळी सादर करण्यात आला. पर्यावरण रक्षण, मृदा संवर्धन, जल अभियान यांसारख्या विषयांवर आधारीत चित्ररथ या यात्रेत सहभागी झाले होते. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता विषयक जनजागृती पालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आली.

विविध संस्थांकडून शहरातील चौकाचौकात मंच उभारण्यात आले होते. या मंचाकडून पालखीचे स्वागत करण्यात येत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्वेतील चार रस्ता येथून शोभायात्रेत आपली उपस्थिती लावली.

पायी चालत त्यांनी पालखीतील गणरायाचे दर्शन घेतले. त्यानंतर पालखीला खांदा देत पालखीचे भोई झाले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या या भूमिकेमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये एकच उत्साह संचारला होता. मुख्यमंत्री शिंदे यांची छबी आपल्या फोन मध्ये टिपण्यासाठी सर्वांची एकच धडपड सुरू झाली.

यावेळी गर्दीला आवरताना पोलिसांच्या नाकीनऊ आल्याचे दिसून आले. शिंदे यांनी देखील कोणाचे मन न दुखावता अनेकांसोबत फोटो काढले. त्यानंतर श्री गणेश मंदिरात जाऊन त्यांनी श्री गणेशाचे दर्शन घेत डोंबिवलीकरांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मंच उभारण्यात आला होता. या मंचाजवळ मुख्यमंत्री शिंदे हे आले, मात्र ठाकरे गटाकडून त्यांचे स्वागत करण्यात आले नाही. मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना नमस्कार करत पुढे जाणे पसंत केले.

मनसेच्या कार्यालयात मुख्यमंत्री शिंदे यांची उपस्थिती लावली. यावेळी आमदार राजू पाटील यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. भाजपाचे कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांनी देखील मनसे कार्लायलास भेट दिली. शिवसेना, भाजपा, मनसेचे मनोमिलन झाले असून येत्या पालिका निवडणुकांत युती दिसून येईल या चर्चांना उधाण आले होते.

ढोल ताशे पथक ....

दरवर्षी प्रमाणे ढोल ताशा पथकाचा उत्साह शिगेला पोहोचला होता. यावेळी जवळपास 10 ते 12 पथके यामध्ये सहभागी झाली होती. चौका चौकात ढोल ताशा पथकांनी उभे राहून वादन केले. हे वादन ऐकण्यासाठी डोंबिवलीकरांनी गर्दी केली होती. त्यानंतर फडके रोडवर देखील पथक प्रमुखांनी वादन करत सर्वांची मने जिंकली. ढोल ताशाच्या गजरात तरुणाईचे पाय आपसूकच थिरकत होते.

स्वागतयात्रेत गणेश मुर्तीकारांनी भव्य अशा गणेश मूर्ती देखील या यात्रेत सहभागी केल्या होत्या. श्री गणेशाची या भव्य दिव्य मूर्ती पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

तरुणाईचा उत्साह यंदाच्या स्वागत यात्रेत दिसून आला. फडके रोड सह सावरकर रोड, केळकर रोड या ठिकाणी पारंपारिक वेशभूषा परिधान करत तरुणांनी गर्दी केली होती. फडके रोडवर आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली होती. तसेच शोभेच्या वस्तूंनी हा रस्ता सजविण्यात आला होता. या ठिकाणी फोटो काढण्यासाठी, सेल्फी काढण्यासाठी त्यांची धडपड सुरु होती.

आजोबांनी चालवली काठी लाठी...

शोभा यात्रेत लाठी काठीचे खेळ ही खेळण्यात आले. यावेळी एका 75 वर्षीय आजोबांनी या वयात अत्यंत सराईतपणे चालवलेली लाठी काठी पाहून साऱ्यांच्याच नजरा त्याकडे खिळल्या होत्या.

रांगोळ्यांच्या पायघड्या

मंगळवारी सकाळी पाऊस पडल्याने रांगोळ्यांचे काय होणार असा प्रश्न सर्वांना पडला होता. मात्र आज संपूर्ण आकाश निरभ्र असल्याने संस्कार भारतीच्या उमेश पांचाळ यांनी फडके रोड सारख्या अनेक ठिकाणी रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या.

सिनेकलाकारांची उपस्थिती

केदार शिंदे, सना शिंदे, अंकुश चौधरी, आकाश ठोसर, सायली पाटील, मयुरी वाघ, राज हंचन्नाळे, शिवाली परब यांसह हास्यजत्रा मधील इतर कलाकार सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; देशपांडेने दुसऱ्याच षटकात दिले दोन धक्के

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT