मुंबई

चला आजपासून व्यायामाला करा सुरुवात; जिम, व्यायामशाळा सुरु

पूजा विचारे

मुंबईः लॉकडानमुळे गेल्या सात महिन्यांपासून बंद असणाऱ्या व्यायामशाळा आजपासून सुरु झाल्या आहेत. दसऱ्याच्या मुहूर्तावर व्यायामशाळा सुरु करण्यासाठी राज्य सरकारनं परवानगी दिली. त्यानुसार आजपासून व्यायामशाळा सुरु झाल्यात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याआधीच कोरोना प्रतिबंधात्मक नियम आणि निर्बंधांचे काटेकोर पालन करून राज्यातील व्यायामशाळा (जिम, फिटनेस सेंटर्स) सुरू करण्यास  परवानगी दिली आहे.

जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा या जनतेच्या आरोग्यासाठीच आहेत. त्यामुळे या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जास्तीत जास्त काळजी घेण्यात यावी. त्यासाठी तयार करण्यात आलेल्या एसओपीचे काटेकोर पालन करण्यात यावे असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

यावेळी  स्टीम बाथ, सौना, शॉवर आणि झुम्बा, योगा असे सामूहिक व्यायाम प्रकार कोरोना प्रतिबंधाबाबतच्या नियमावलीनुसार पूर्णपणे बंद राहणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. हे नियम तपशीलाने आणि नेमकेपणाने तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये व्यायामासाठी येणाऱ्या सदस्यांना या ‘एसओपी’ची पूर्णपणे माहिती देणे अपेक्षित आहे. व्यायाम शाळेच्या वेळा, तसेच मर्यादित संख्येत प्रवेश देणे. प्रशिक्षक, अन्य व्यवस्थापकीय अधिकारी यांची वारंवार आरोग्य तपासणी तसेच स्वच्छतेच्या बाबी यासाठी तपशीलाने नियमावली तयार करण्यात आली आहे.

असे असतील व्यायामशाळेतील नियम

  • व्यायामशाळेच्या वेळा, तसेच मर्यादित संख्येत प्रवेश देणे.
  • व्यायामशाळा सदस्यांना संपूर्ण नियमावलीची माहिती द्यावी.
  • प्रशिक्षक, अन्य व्यवस्थापकीय अधिकारी यांची वारंवार आरोग्य तपासणी करावी.
  • व्यायामशाळेचे दर तासाला निर्जंतुकीकरण करणे, उपकरणांमध्ये अंतर ठेवणे, वापरानंतर त्यांचे निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक असेल.
  • शारीरिक अंतर, हातांची स्वच्छता आणि मास्क वापरणे या नियमित गोष्टींबरोबरच, क्षेत्रफळांनुसार जास्तीत जास्त सुरक्षित शारीरिक अंतर राखणे.
  • दररोज रात्री व्यायामशाळा बंद झाल्यानंतर पूर्णपणे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे.
  •  सामूहिक व्यायाम प्रकार झुम्बा, स्टीम, सौना बाथ बंद असेल.

Gym and gymnasium open in Mumbai from today

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bailgada Sharyat: वेग, ताकद अन् जिद्दीला अखेरचा निरोप! पुणे जिल्ह्यात दबदबा असलेल्या ओम्या बैलाचं निधन

Raksha Bandhan 2026: पौर्णिमा 9:47 ला संपणार, मग राखी बांधायची कधी? ‘हे’ 3 मुहूर्त ठरतील खास

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Marathi News Live Updates : जर आमच्या निदर्शनास आले की कोणी हिंदीत बोलत आहे किंवा उद्धटपणे वागत आहे, तर आम्ही त्यांना मारू - अमित ठाकरे

Pune Traffic Issue : वाहतुकीचा अभ्यास करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती; ‘रिअल टाइम डेटा’नुसार होणार अभ्यास

SCROLL FOR NEXT