मुंबई

आता मुंबईतल्या कॉलेजातील पोरं होणार आणखी फिट.. कसे ? तुम्हीच वाचा.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये ‘व्यायामाचा तास’ सुरू करण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सप्टेंबरमध्ये दिले होते. हा कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी यूजीसीने नुकतेच महाविद्यालय व विद्यापीठांना फिटनेस क्‍लब सुरू करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्व जारी केले आहे.

केंद्र सरकारकडून जानेवारी २०२० पासून ‘फिट इंडिया’ मोहिमेला सुरुवात करण्यात येणार आहे. ही मोहीम महाविद्यालय, विद्यापीठांमध्ये राबवण्याचे निर्देश यूजीसीने विद्यापीठांना दिले होते. त्यानुसार प्रत्येक महाविद्यालय व विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी व्यायामासाठी एक तास राखीव ठेवावा लागणार होता. व्यायामाच्या तासाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी यूजीसीने १३ डिसेंबरला नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्यानुसार महाविद्यालयांना व्यायामशाळा सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

व्यायामशाळेच्या प्रमुखपदी क्रीडा शिक्षकांची नियुक्ती करण्याबरोबरच खेळाची आवड असणारे विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांना सदस्य म्हणून नियुक्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच खेळांची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांची स्वयंसेवक म्हणून नियुक्ती करण्यात यावी. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याबाबत काळजी घेण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील सर्व तपशील नोंदवून तो तयार करण्यात येणाऱ्या संकेतस्थळावर अपडेट करावा आणि त्या माहितीनुसार राष्ट्रीय पातळीवरील विजेत्यांची घोषणा केली जाणार असल्याचेही म्हटले आहे.

क्रीडा स्पर्धांचे आयोजन
प्रत्येक शिक्षण संस्थेने वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून त्यातून राज्य व राष्ट्रीय विद्यापीठ स्तरावरील क्रीडापटू घडवण्यासाठी प्रयत्न करावेत. सर्व वर्षाचे नियोजन करून त्याचा अहवाल जानेवारी २०२० पर्यंत यूजीसीकडे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Alert : कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट ! हवामान खात्याचा मोठा इशारा, जाणून घ्या राज्यात आज कसे असेल हवामान?

Krishna Sugar Factory: कृष्णा कारखान्यासाठी आजपासुन धुमशान; उमेदवारी अर्ज आजपासुन २२ मे पर्यंत दाखल करता येणार, भोसले विरुद्ध मोहिते पुन्हा संघर्ष..

Satara Politics: सातारा पालिकेतील वादावर शिवेंद्रसिंहराजेंचा दणका; उदयनराजेंनंतर शिवेंद्रसिंहराजेंचीही बैठक, 'निवडून आणलं, पाडूही शकतो'..

मोठी बातमी! ग्रामीणमधील नववी-दहावीच्या 20 विद्यार्थ्यांसाठी 3 शिक्षक; शहरांमधील 300 शाळांना लावावे लागणार कुलूप; प्रत्येक वर्गात 20 पटसंख्येची अट

Panchang 18 May 2026 : पंचांग! शुभ मुहूर्त, राहुकाळ, चंद्रदर्शन आणि सर्वार्थसिद्धी योग माहिती

SCROLL FOR NEXT