मुंबई

फरार मल्ल्या कोणत्याही क्षणी येणार मुंबईत? कर्जबुडव्या विजय मल्ल्याची रवानगी होणार मुंबईच्या 'या' जेलमध्ये...

सकाळवृत्तसेवा

मुंबई - देशातल्या अनेक बँकांना 9000 कोटींचा गंडा लावून फरार झालेला कर्जबुडवा उद्योगपती विजय मल्ल्याला अखेर भारतात आणण्यात येणार आहे अशी माहिती समोर येतेय. ब्रिटनमधल्या कोर्टात मल्ल्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरल्यानं त्याचं भारतात प्रत्यार्पण करण्याला कोर्टाने मान्यता दिली आहे. त्यामुळे त्याला कोणत्याही क्षणी मुंबईत आणण्याची शक्यता आहे. 14 मे रोजीच ब्रिटनच्या न्यायालयनानं त्याचा प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा केला. ब्रिटनमध्ये CBIची टीम हजर असून ते मल्ल्याला घेऊन मुंबईत घेऊन येण्याची शक्यता सूत्रांनी दिलीय. तपास यंत्रणांनी आयएएनएस (IANS)ला याबाबत माहिती दिली आहे.

मल्ल्याला भारतात आणल्यानंतर मुंबईतल्या आर्थर रोड जेलमध्ये त्याची रवानगी करण्यात येणार आहे. मल्ल्याविरोधात मुंबईत गुन्हे दाखल करण्यात आले असल्यानं त्याची चौकशीही मुंबईतचं होईल. मल्ल्याला भारताच्या स्वाधीन केल्यानंतर अधिकारी लगेच मुंबईकडे निघण्याची शक्यता आहे.

पुढच्या 24 तासांमध्ये त्याला मुंबईत आणण्यात येईल. विमानतळावर त्याची मेडिकल टेस्ट होणार आहे. या दरम्यान मल्ल्यासोबत सीबीआय आणि ईडीचे अधिकारीही सोबत असणार आहे. त्यानंतर त्याला कोर्टात हजर केलं जाईल. 
मुंबईतल्या ऑर्थर रोड जेलमध्ये त्याला एका विशेष कोठडीत ठेवण्यात येईल. ED आणि सीबीआय कोर्टात त्याची कस्टडी मागणार असून आर्थिक गैरव्यव्हराची चौकशी केली जाणार आहे.

इंग्लंडमधल्या न्यायालायानं विजय मल्ल्याच्या भारतातील प्रत्यार्पणावर शिक्कामोर्तब केलं होतं. त्यानंतर नियमांनुसार मल्ल्याला 28 दिवसांमध्ये भारतात आणणं गरजेचं होतं, त्यातील 20 दिवस आधीच निघून गेलेत. सद्यपरिस्थितीत प्रत्यार्पणाची सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असल्यानं विजय मल्ल्या कधीही भारतात परतू शकतो.

किंगफिशर एअरलाइन्सचा मालक विजय मल्ल्यावर देशातील 17 बँकांचे 9000 कोटींचे कर्ज बुडवल्याचा आरोप आहे. कर्ज न फेडताच तो भारतातून पळून गेला होता. 3 मार्च 2016 मध्ये मल्ल्यानं भारत सोडून ब्रिटनमध्ये पलायन केलं होतं. 14 मे 2020 रोजी इंग्लंडनं मल्ल्याचा भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा केला होता.

handover process of mallya started vijay mallya will be kept in this jail on mumbai  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT