Mumbai Local News Sakal
मुंबई

सेंट्रल व हार्बर लाईनची वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचा खोळंबा

तांत्रिक बिघाडामुळे काही गाड्या बंद असून काही गाड्या उशीरा सुटणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मुंबईतलं दळणवळणाचं प्रमुख माध्यम असलेली लोकल ट्रेन सध्या खोळंबली आहे. त्यामुळे मुंबईतल्या वेगावर चाप बसला आहे. यंत्रणांमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे हा खोळंबा झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाकडे जाणाऱ्या, तसंच सेंट्रल आणि हार्बर लाईनवर प्रवास करणाऱ्यांचा चांगलाच खोळंबा झालेला आहे.

मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी याविषयीची माहिती दिली आहे. वाशी स्थानकावर सिग्नलिंग यंत्रणेत झालेल्या काही तांत्रिक अडचणींमुळे पहाटे पाच वाजल्यापासून वाहतुकीवर पहिणार झाला आहे. मानखुर्द आणि पनवेल मार्गे डाऊन हार्बर गाड्या धावत नाहीत. ट्रान्सहार्बर मार्गावरील ठाणे आणि वाशी दरम्यानच्या गाड्या धावत नाहीत.

कोणत्या गाड्या सुरू आहेत?

  • सध्या डाऊन हार्बर लाईनवरील गाड्या सकाळी ६.२५ पासून पुन्हा सुरू झाल्या आहेत.

  • अप आणि डाऊन हार्बर लाईन गाड्या सुरू आहेत.

  • ट्रान्सहार्बर मार्गावरील ठाणे आणि नेरुळ/पनवेल - ठाणे गाड्या सुरू आहेत.

  • ट्रान्सहार्बर मार्गावरीलच ठाणे -वाशी-ठाणे गाड्याही सकाळी ६.४५ पासून पुन्हा सुरू करण्यात आलेल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Sushila Karki Government : नेपाळच्या सुशीला कार्की सरकारचा मोठा निर्णय! आंदोलनात जीव गमावलेल्या ‘Gen-Z’ ना शहीद दर्जा!

IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध विजयानंतर भारताच्या सायलंट किलरला मिळालं 'इम्पॅक्ट प्लेअर' मेडल; पाहा ड्रेसिंग रुममधील Video

Pratap Sarnaik : महाराष्ट्रात इलेक्ट्रिक दुचाकी, टॅक्सी सेवेसाठी भाडेदर निश्चित; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Priyank Kharge statement : प्रियांक खर्गेंंचं हिंदू धर्माबाबत मोठं विधान! ; निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला पडणार महागात?

Latest Marathi News Updates : एससी आरक्षण बदलल्याचा खोटा प्रचारः राहुल डंबाळे

SCROLL FOR NEXT