मुंबई

Anil Parab: गरीबांची घर तोडायची जबाबदारी भाजपनं सोमय्यांना दिलीए का? क्लीनचीटनंतर परबांचा सवाल

आपला या प्रकरणाशी संबंध नसल्याचं पत्र म्हाडानं दिल्याचा दावा अनिल परब यांनी केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर टीका करताना म्हाडाच्या जागेवर अतिक्रमण केल्याचा दावा केला होता. पण हा दावा खोटा असल्याचं पत्र आपल्याला म्हाडानं दिल्याचं परब यांनी म्हटलं आहे. त्यामुळं सोमय्यावर जोरदार हल्लाबोल करताना भाजपनं सोमय्यांना गरीबांची घरं तोडायची जबाबदारी दिलीए का? असा सवालही त्यांनी केला. (Has BJP given responsibility of demolishing houses of poor to Kirit Somayya says Anil Parab)

परब म्हणाले, किरीट सोमय्या स्वतःला भाजपचे माजी खासदार समजतात त्यामुळं मी भाजपला प्रश्न विचारला आहे की, गरीबांची घरं तोडण्याची जबाबदारी भाजपनं किरीट समय्यांना दिली आहे का? हा लढा संपलेला नाही याचं कारण, आता ब्लॅकमेलर्स, बिल्डर्स हे लोकांना घाबरवणार आणि लोकांना कमी जागा देण्यासाठी या ऑर्डरचा वापर केला जाईल. याचं पाप हे किरीट सोमय्या आणि भाजपला भोगावं लागेल.

दरम्यान, सोमय्यांना आव्हान देताना परब म्हणाले, मी पोलिसांना हे आवाहन केलं होतं की, सोमय्यांना घेऊन या. पण सोमय्या आले नाहीत कारण ते घाबरट आहेत. एकतर सोमय्या म्हाडाचे किंवा महापालिकेचे मुकादम आहेत का? त्यांना अशी नौटंकी करायची सवय आहे. आम्ही त्यांना मारणार नव्हतो तर त्यांच्या स्वागतासाठी उभे होतो. शिवसैनिकांची त्यांना एवढी भीती वाटते का?

शिवसेना जनतेसोबत मजबुतीनं उभी आहे. आम्ही कोणाच्याही घरावर हातोडा पडू देणार नाही. म्हणून उपजिल्हाधिकाऱ्यांना घेऊन आम्ही फिरतोय की त्यांनी किती लोकांवर कारवाई केली, ते पाहतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : ऊसतोड कामगारांच्या सुरक्षिततेची काळजी घ्या; बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे साखर आयुक्तालयाच्या कारखान्यांना सूचना

Solapur Politics: सुधीर खरटमल राष्ट्रवादीत; ज्येष्ठ नेते बळीराम साठेंचा लवकरच प्रवेश, उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरच सोलापूर दौऱ्यावर

Magician Shamsundar: इंस्टाग्रामचा लाडका जादूगार शामसुंदर काका ‘अदृश्य’… ८४व्या वर्षी मागे ठेवून गेले हसू अन् जादूच्या आठवणी

Mundhwa Land Scam : मुंढवा जमीन गैरव्यवहार; सहदुय्यम निबंधक रवींद्र तारू निलंबित, चौकशीसाठी समिती नेमली

Stomach Health: समोसा किंवा पाणीपुरी नाही तर 'हे' पदार्थ खाल्ल्याने वाढते गॅस आणि अपचन, गॅस्ट्रोलॉजिस्टने व्हिडिओ शेअर करत दिली माहिती

SCROLL FOR NEXT