Mumbai Sakal
मुंबई

सोमय्या यांना केंद्र सरकारने नियुक्त केले आहे का?'

योग्य कागदपत्रे हातात लागल्यावर ते प्रसारमाध्यमांसमोर येतात.

सकाळ वृत्तसेवा

मुरूड : महाराष्ट्रातील कथित भ्रष्टाचाराची प्रकरणे माजी खासदार किरीट सोमय्या बाहेर काढत आहेत. योग्य कागदपत्रे हातात लागल्यावर ते प्रसारमाध्यमांसमोर येतात. मात्र, प्रसिद्धी मिळवल्यानंतर त्या प्रकरणाचे पुढे काय झाले किंवा भ्रष्टाचार सिद्ध झाला का, ही माहिती देत नाहीत.

त्यामुळे भ्रष्टाचाराची प्रकरणे काढण्यासाठी केंद्र सरकारने त्यांना नियुक्त केले आहे काय, असा प्रश्न असून भाजपने या प्रश्नाचे जाहीर उत्तर द्यावे, अशी मागणी करत माजी आमदार डी. एन. चौलकर यांनी सोमय्या यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महाराष्ट्रात कोणताही नेता प्रबळ होत असेल, तर त्याच्यामागे ईडीची चौकशी लावली जाते. भाजपमध्ये कोणी भ्रष्टाचार करीत नाही का, असा प्रश्न चौलकर यांनी उपस्थित केला. सोमय्या यांनी मागील पाच वर्षांत किती भ्रष्टाचाराची प्रकरणे काढली, त्या प्रकरणांमधून निष्कर्ष काय निघाला, याची माहितीसुद्धा सर्वसामान्य नागरिकांना द्यावी, भ्रष्टाचाराची प्रकरणे काढल्यावर आठ ते दहा दिवस ते माध्यमांसमोर येतात, नंतर ते शांत का बसतात, याचे उत्तर त्यांनी द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tea Price Hike : चहा महागला! युद्धाचा फटका थेट चहावर; प्रति कप ₹1 दरवाढ

IPL VIP Tickets : सामान्य प्रेक्षकांसारखे रांगेत उभे राहावे लागू नये, आमदारांचा मोफत तिकिटांसाठी ‘खेळ’… मोदींच्या वक्तव्याने खळबळ!

Latest Marathi News Live Update : दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

AI Courses : घरबसल्या फ्रीमध्ये शिका AI अन् मिळवा लाखोंची नोकरी, सरकारकडून १५,००० स्कॉलरशिप, काय योजना आहे पाहा

Uttar Pradesh: परदेशात नोकरीला जाण्यापूर्वी युपीचे तरुण शिकणार तिथली भाषा! योगी सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT