मुंबई

ही बातमी वाचून तुम्ही म्हणू शकता. अरे दूध कुठे पितो, चल बिअर प्यायला जाऊ

सकाळ वृत्तसेवा

अरे दूध वगैरे कुठे पितो, चल बिअर प्यायला जाऊ.. मजेत असं अनेकजण आपल्या मित्रांना बोलत असतात. पण तुम्हाला सांगितलं, की बिअर ही दूधापेक्षा चांगली तर ? पेटा ( PETA) पीपल फॉर अॅथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल यांनी हा दावा केलाय. त्यांच्या एका रिपोर्टमध्ये सदर दावा करण्यात आलाय.  कदाचित तुम्हाला हे वाचून धक्का बसू शकतो, पण 'हो', हे खरंय. 

बिअर प्यायल्याने हाडं मजबूत तर होतातातच बरोबरच माणसाचं आयुष्य देखील वाढतं असं या PETA च्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय. यामध्ये दूधाचे दुष्परिणाम सुद्धा नमूद केले आहेत. गायीच्या दूधाने लठ्ठपणा येतो, याचसोबत कन्सर किंवा  डायबिटीज सारखे आजार देखील होऊ शकतात असं देखील नमूद केलंय. त्यामुळे PETA च्या म्हणण्यानुसार बिअर दुधापेक्षा आरोग्यदाई आहे.    

पेटानं रिपोर्टमध्ये काय म्हटलंय?

बिअर बनवण्यासाठी ज्या वस्तूचा वापर केला जातो. त्यात पोषक तत्वं असतात. गहू, मक्का, तांदळाचा वापर केला जातो ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे. बिअरमध्ये  ९० टक्के पाण्यासह फायबर, कॅल्शियम, आयरनसह शरीराला फायदेशीर पोषक तत्व असतात. बियरमुळे व्यक्तीचे हाडे मजबूत होतात. शरिरातील मांसपेशींच्या विकासासाठी हे फार फायदेशीर आहे. दररोज दूध प्यायल्याने हृदयरोग, लठ्ठपणा, डायबिटीज आणि कॅन्सर यासारखे आजार होत असल्याचं म्हटलंय

आपल्याला कायमच  दूध प्यायल्यानं, कसा फायदा होतो हे शिकवलं जातं. जर कुणी दूध पीत नसेल तर त्यात अनेक प्रकारच्या पावडरी टाकून ते मुलांना पाजलं जातं. मात्र पेटाच्या या नव्या दाव्यानं आता नवा वाद निर्माण झालाय. यापुढं चांगल्या आरोग्यासाठी दूधपेक्षा बियर पिण्याचा कुणी सल्ला दिला तर आश्चर्य वाटू देऊ नका..

WebTitle : having beer is heather than drinking milk peta report 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT