mumbai sakal media
मुंबई

कोरोना काळात "मुंबईत" मलेरियाच्या चाचण्या घटल्या

मुंबई महानगर पालिका क्षेत्रात पावसाळी आजारांची तपासणी नेहमीच केले

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई महानगर पालिका (Mumbai Municiple) क्षेत्रात पावसाळी (rainy) आजारांची तपासणी (Check) आणि निदान नेहमीच केले जाते. यात मलेरिया (Malaria) चाचण्या केल्या जातात. मात्र गेल्या वर्षीपासून मलेरियाच्या (Malaria) चाचण्या घटल्याचे समोर येत आहे.

गेल्या मार्चमध्ये कोरोना (Corona) सुरु झाल्यापासून मलेरियाच्या (Malaria) तपासणीत कमालीची घट आली आहे. त्यामुळे मलेरिया (Malaria) रूग्ण देखील घटल्याचे (Less) समोर येत आहे.

दरम्यान पालिकेच्या आरोग्य विभागाकडून (Health Department) देण्यात आलेल्या माहितीनुसार ११ जुलै पर्यंत मलेरियाचे १९९१ रूग्ण आढळले. दर वर्षी पावसाळी आजारात मलेरिया रूग्ण नेहमीच आघाडीवर असल्याचे चाचण्यांमधून समोर आले आहे. मात्र गेल्या वर्षी पासून मलेरियाचे रुग्णच घटल्याचे चित्र आहे.

मलेरिया चाचण्यांबाबत पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी म्हणजेच २०२० मध्ये मलेरियाच्या ८ लाख ८२ हजार ७७१ एवढ्या चाचण्या केल्या गेल्या. तेच २०२१ च्या ३१ मे पर्यंत फक्त ४ लाख ०६ हजार ४७२ एवढ्याच चाचण्या केल्या गेल्या. तर, २०२० आणि २०२१ मध्ये जेवढ्या चाचण्या झाल्या आहेत तेवढ्या २०१९ या एका वर्षात झाल्या होत्या.

यापूर्वी २०१७ या वर्षात १३ लाख ८९ हजार ४४० इतक्या मलेरिया चाचण्या झाल्या असून यातून ६०१९ मलेरियाचे रूग्ण आढळले. तर, २०१८ या वर्षात १३ लाख ७६ हजार १८५ इतक्या मलेरिया चाचण्या मधून ५०३६ इतके रूग्ण आढळून आले. तसेच, २०१९ या वर्षभरात १४ लाख ५ हजार ७५८ इतक्या मलेरिया चाचण्यांमधून ४३५७ मलेरिया रूग्ण आढळले होते. मात्र, २०२० मध्ये कोरोना महामारी पसरल्यानंतर चाचण्यांमध्ये घट झाली आहे.

२०२० या वर्षभरात निव्वळ ८ लाख ८२ हजार ७७१ मलेरिया चाचण्या झाल्या. या चाचण्यांची संख्या २०१९ या वर्षीच्या निम्मी आहे. यातून ५००७ मलेरिया रूग्ण आढळले.

तर,सुरु असलेल्या २०२१ या वर्षाच्या मेपर्यंत केलेल्या चाचण्यांमधून १ हजार ३८५ रूग्ण आढळले होते. आता हळूहळू मलेरिया रुग्णांची संख्या वाढत असल्याचे समोर येत आहे.

कोरोना महामारीमुळे २०२० मध्ये नक्कीच इतर चाचण्या कमी झाल्या आहेत. पण, २०२१ मध्ये आतापर्यंत ४ ते ५ लाखांहून अधिक मलेरिया चाचण्या झाल्या आहेत. उर्वरित कालावधीत चाचण्यांचे प्रमाण वाढेल. रुग्णसंख्या ही नियंत्रणात आहे. पावसाळी आजारांसाठी सर्व तयारी केली गेली आहे. शिवाय फिव्हर क्लिनिक ही सुरू करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

https://www.oberoirealty.com/elysian?utm_source=digital&utm_medium=columbia&utm_term=ELYCLM&ad=0_5687660_ba93739e-2c1f-4d68-9646-99dde929f155-1sj4s_048a2f76-1a85-4051-b290-08932c7ed185-1sjd4_1788_58756452_144_348322_1_144_null_null_18_348011_348020_348006_null_1808_34755&col_ci=R132N802j3211629196104603ca3wdix2276kw4wn95v3k

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस; बाणेर-औंध रस्ता वाहतुकीसाठी अजूनही ठप्प

Malkapur Accident : भरधाव मारुती इको कारची समोर चालणाऱ्या ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक; ५ जणांचा मृत्यू , ४ जण गंभीर जखमी

Chikhali Accident : शिक्षक आमदाराच्या गाडीने तरुणास उडविले; तरुण गंभीर जखमी होऊन सध्या कोमात

SCROLL FOR NEXT