File Photo 
मुंबई

त्यांनी पाहिले...अन् वाचले जखमी प्रवाशाचे प्राण

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी रेल्वे रुळावर जखमी अवस्थेत पडलेल्या एका तरुणाचे प्राण मोटरमनच्या सतकर्तेमुळे वाचले. ही घटना मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील ठाकुर्ली स्थानकात घडली.

बुधवारी (ता.1) मोटरमन ए.आर.वर्मा हे सीएसएमटी ते कल्याण डाऊन लोकलवर कार्यरत होते. सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ठाकुर्ली स्थानकात लोकल शिरताना अप धिम्या आणि डाऊन जलद मार्गावरील रेल्वे ट्रॅकच्या मध्ये एका तरुण जखमी अवस्थेत पडल्याचे निदर्शनास आले. मोटरमन वर्मा यांनी तात्काळ आपातकालीन ब्रेक लावत लोकल थांबवली. याबाबतची माहिती त्यांनी गार्ड आणि आरपीएफला दिली. मोटरमन वर्मा आणि गार्ड पी.सी.पेडेकर यांनी काही प्रवाशांच्या मदतीने जखमी प्रवाशाला फलाटावर उचलुन आणले.

त्यानंतर आरपीएफने तात्काळ त्या तरुणाला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. जखमी प्रवाशाचे नाव कार्तिक सिंह (वय 35) असून तो दिवा येथील रहिवासी आहे. यापूर्वी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मोटरमन वर्मा यांनी डोबिवली स्थानकात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मतीमंद महिलेचे प्राण वाचविले होते. त्याबद्दल त्यांना मुंबई विभागाकडून पारितोषिक दिले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT