मुंबई

कोरोनाशी लढताना नोकरीच्या शेवटच्या दिवशी त्यांनी घेतला अखेरचा श्वास; ठाणे महापालिकेतील कर्मचाऱ्याच्या निधनामुळे हळहळ

सकाळ वृत्तसेवा


ठाणे : महापालिकेच्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीचे उप करनिरिक्षकाचा कोरोनाशी सुरु असलेला 20 दिवसांचा लढा त्यांच्या मृ्त्यूनंतर संपला आहे. विशेष म्हणजे शनिवारी त्यांच्या महापालिकेतील नोकरीचा अखेरचा दिवस असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली आहे. 
या कर्मचाऱ्याचे वय 55 वर्षेापेक्षा अधिक असताना देखिल त्यांना भाईंदरपाडा येथील क्वॉरन्टाइन सेंटरची जबाबदारी देण्यात आली होती. त्या दरम्यान त्यांना कोरोनाने गाठल्यानंतर उपचारा दरम्यान हृदय विकाराच्या धक्याने त्यांचा मृत्यु झाला.

माजिवडा मानपाडा प्रभाग समितीत कार्यरत असलेले उप करनिरिक्षक हे मागील 11 मे रोजी कोरोनामुळे घोडबंदर भागातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. त्यानंतर पाच ते सहा दिवसांनी त्यांना बरे वाटू लागल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. परंतु दुसऱ्याच दिवशी त्यांना पुन्हा त्रास होऊ लागल्याने ते पुन्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. त्यानंतर कोरोनाशी लढा देत असतांना मागाली काही दिवस ते आयसीयुमध्ये व्हेटींलेटरवर होते. त्यातच शनिवारी त्यांचा मृत्यु झाला. परंतु त्यांचा मृत्यु हृदयविकाराच्या धक्याने झाला असावा असा प्राथमिक अंदाज पालिकेने वर्तविला आहे. दरम्यान त्यांची पत्नी आणि मुलालाही कोरोनाची लागण झाली होती. परंतु त्यातून ते दोघेही बरे झाले आहेत. 

महापालिकेच्या सेवेतून रविवारी 64 कर्मचारी, अधिकारी, सफाई कामगार सेवा निवृत्त होणार होते. त्या यादीतही या उप करनिरिक्षकांचे नाव 21 व्या क्रमांकावर होते. परंतु अशा पध्दतीने त्यांच्या आयुष्याचा शेवट होईल असे स्वप्नातही वाटले नव्हते अशी प्रतिक्रिया सेवा निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

कामातील कर्तव्यदक्षपणामुळे होत असे कौतूक
शनिवार हाच त्यांच्या नोकरीचा शेवटचा दिवस होता. याच दिवशी त्यांच्या आयुष्याचाही असा दुर्देवी शेवट झाल्याने महापालिकेत हळहळ व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे गेली सलग दोन वर्षे त्यांनी कर वसुलीत उच्चांक गाठला होता. गेल्या आर्थिक वर्षात त्यांनी 108 टक्के वसुली केली होती. यंदा त्यांनी 102 टक्के वसुली केली होती. त्यामुळे त्यांच्या कामाचे कौतुक सर्व स्तरातून झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT