deepak-sawant
deepak-sawant 
मुंबई

आरोग्य विभागात तेराशे जागा भरणार 

सकाळवृत्तसेवा

मुंबई - ग्रामीण व आदिवासी भागात आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी राज्यात नव्याने 74 आरोग्य उपकेंद्र, 20 प्राथमिक आरोग्य केंद्र, एक ग्रामीण रुग्णालय, तीन उपजिल्हा रुग्णालय, दोन जिल्हा रुग्णालय, चार स्त्री रुग्णालय व सहा ट्रॉमा केअर युनिट अशा 111 नवीन आरोग्य संस्थांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी 1332 नव्याने जागा निर्माण करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज येथे सांगितले. 

आरोग्यमंत्री डॉ. सावंत या वेळी म्हणाले की, ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक दर्जेदार व वेळेवर उपचार मिळावे यासाठी 111 विविध आरोग्य संस्थांची निर्मिती करण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. या नव्याने निर्माण होणाऱ्या आरोग्य संस्थांमध्ये 74 आरोग्य उपकेंद्र असून ते गोंदिया, उस्मानाबाद, बीड, परभणी, जालना, औरंगाबाद, सांगली, नगर, नंदुरबार, जळगाव, नाशिक व ठाणे या जिल्ह्यातील गावांमध्ये सुरू करण्यात येणार आहेत. या उपकेंद्रांकरिता आरोग्य सेवक, एएनएम, अंशकालीन स्त्री परिचर अशी 222 नवीन पदे निर्माण केली जाणार आहेत. 

राज्यात 20 ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र नव्याने सुरू करण्यात येत असून नाशिक, नंदुरबार, सातारा, कोल्हापूर, अमरावती, गडचिरोली जिल्ह्यांमधील गावांत ही प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत होतील. त्यामध्ये सर्वाधिक बारा प्राथमिक आरोग्य केंद्र नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुरू होणार असून, या आरोग्य केंद्रांसाठी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहायक, एएनएम, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, मिश्रक, स्त्री व पुरुष परिचर अशी एकूण 240 पदे नव्याने निर्माण केली जाणार आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील मंदाणे येथे 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब व नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे प्रत्येकी 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सावंतवाडी, कणकवली (जि. सिंधुदुर्ग), वरोरा (जि. चंद्रपूर), देगलूर (जि. नांदेड) येथील उपजिल्हा रुग्णालयात तर राजगुरुनगर (जि. पुणे) व सटाणा (जि. नाशिक) येथील ग्रामीण रुग्णालयात ट्रामा केअर युनिटस्‌ सुरू करण्यात येणार आहे. 

धुळे, गडचिरोली, चंद्रपूर आणि नंदुरबार येथे 100 खाटांचे स्त्री रुग्णालय नव्याने सुरू करण्यात येणार आहे. धुळे येथील 100 खाटांच्या जिल्हा रुग्णालयासाठी व तेथील दहा विशेषोपचार कक्षासाठी पद निर्मित्ती करण्यात येणार आहे. जळगाव जिल्हा रुग्णालयाचे 300 खाटांवरून 400 खाटांचे श्रेणीवर्धन करण्यात येणार असून त्यासाठी 48 पदे निर्माण केली जाणार आहेत. अमरावती येथे विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय टप्पा-2 नव्याने सुरू करण्यात येणार असून कार्डिओलॉजी, कार्डायाक सर्जरी, ऑन्कोलॉजी, ऑन्कोसर्जरी, न्युरॉलॉजी व न्युरोसर्जरी आदी अतिविशिष्ट सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी 278 जागांची निर्मिती करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. 

नवीन जागांची स्थिती 
नवनिर्मित 1332 जागांमध्ये गट-अ दर्जाचे 267 वैद्यकीय अधिकारी, उर्वरित 1065 पदांमध्ये वैद्यकीय व अवैद्यकीय गट-क संवर्गातील पदांमध्ये 66 परिसेविका, 33 बालरोग परिचारिका, 21 परिचारिका, 293 अधिपरिचारिका, 22 क्ष-किरण तंत्रज्ञ, 39 प्रयोगशाळा तंत्रज्ञ, 17 रक्तपेढी तंत्रज्ञ, 44 औषधनिर्माता, आरोग्यसेवक स्त्री-पुरुष 94 पदे, पुरुष व स्त्री परिचर 80 पदे, 20 सहायक परिचारिका प्रसविका, 20 प्रयोगशाळा सहायक, 14 वरिष्ठ लिपिक व 26 कनिष्ठ लिपिक अशा पदांचा समावेश आहे. 

साडेतीनशे भूमकांना प्रशिक्षण 
मेळघाट भागातील आदिवासीपर्यंत आरोग्य सेवा पोचविण्यासाठी भूमकांची (गाव प्रमुख) मदत घेण्यात येणार असून मेळघाटमधील सुमारे 350 भूमकांना गेल्या सहा महिन्यांपासून प्रशिक्षण देण्यात येत आहे. आदिवासी भागातील बालमृत्यू व मातामृत्यू कमी होण्याकरिता आदिवासींनी प्राथमिक आरोग्य केंद्रातच उपचार घ्यावेत यासाठी भूमकांवर जबाबदारी सोपविण्यात आली असून त्यांना याकामी प्रतिरुग्ण 200 रुपये मानधन देण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

Prajwal Revanna : 'प्रज्वल' प्रकरणामुळे प्रचाराची दिशाच बदलली; काँग्रेस आक्रमक, JDS ऐवजी भाजप नेते रडारवर

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलवर नोकरी गमावण्याची वेळ

Latest Marathi News Live Update : १५ जूनपर्यंत मालमत्ता कर भरल्यास मिळणार १०% सूट

SCROLL FOR NEXT