मुंबई

दिल्लीप्रमाणे आता मुंबईतही 'कोविड'वर प्लाझ्मा थेरपीचा उतारा...

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई : भारतात पहिल्या कोरोना बाधित रुग्णाला प्लाझ्मा थेरेपी देण्यात आली. साकेत भागातील मॅक्स हॉस्पीटलमध्ये थेरेपी देण्यात आली. महत्वाचं म्हणजे थेरेपी दिल्यानंतर या रुग्णाच्या आरोग्यात सकारात्मक सुधारणा झाल्याने कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी नव दालन निर्माण झालंय. त्यामुळे राज्यात ही प्लाझ्मा थेरपी चा वापर करण्याचे विचाराधीन असून आयसीएमआर कडे यासाठी परवानगी मागण्यात आल्याचे डॉ तात्याराव लहाने यांनी सांगितले.

दिल्लीतील 49 वर्षीय व्यक्तीला 4 एप्रिल  रोजी वैद्यकीय चाचणीत कोरोनाची लागण झाल्याचं  स्पष्ट झालं होत. त्यानंतर या रुग्णाला मॅक्स हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र या रुग्णांची प्रकृती गेल्या काही दिवसेंदिवस खालावत चालली होती. आणि या रुग्णाला निम्योनियाची बाधा झाल्याने त्याला श्वास घेण्यात त्रास होत होता. त्यामुळे अखेरीस या रुग्णाला वेंटीलेटर ठेवण्यात आले होते. या रुग्णाच्या प्रकृतीत काही सुधारणा होत नसल्यामुळे, रुग्णाच्या कुटुबियांनी प्लाझ्मा थेरेपी देण्याची विनंती केली. कोरोना बाधितावर ही थेरेपी देण्याची देशातील ही पहिलीच घटना होती.

या रुग्णाच्या कुटुंबातील व्यक्तींनी प्लाझ्मा थेरेपीसाठी प्लाझ्मा दिली. प्लाझ्मा डोनरच्या तीन आठवडया अगोदर दोन चाचण्या केल्या गेल्या, त्या चाचणी निगेटीव्ह निघाल्या.  प्लाझ्मा देण्याच्या वेळीही संबधीत डोनरची कोरोना चाचणी घेतली गेली. ती चाचणी निगेटिव्ह निघाली. 14 एप्रिलला या रुग्णाला संपुर्ण वैद्यकीय प्रोटोकॉलनूसार या व्यक्तीवर प्लाझ्मा थेरेपी देण्यात आली. थेरेपी दिल्यानंतर चवथ्या दिवशी या रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आल्या.त्यानंतर वेंटीलेटर काढून घेण्यात आले. या रुग्णाला ऑक्सीजनचा पुरवठा करण्यात आला.सोमवारपासून या रुग्णाला खाऊ घालण्यात येत आहे.

प्लाझ्मा थेरेपीच्या या यशामुळे कोरोनाच्या या आव्हानाला सामोर जाण्यासाठी नवी उपचार पध्दतीचं दालन खुललं आहे. मात्र आपल्याला प्लाझ्मा थेरेपी ही जादूची कांडी नाही हे लक्षात घ्याव लागेल. या रुग्णाच्या उपचारासाठी अनेक वैद्यकीय प्रोटोकॉल अंतर्गत उपचार करण्यात आले. मात्र या रुग्णाच्या प्रकृती सुधारण्यासाठी प्लाझ्मा थेरेपीने महत्वाची भूमिका बजावली असल्याचे समोर आले आहे. अशी पद्धत आपल्याकडे ही वापरण्याबाबत सध्या चर्चा सुरू असली तरी त्याबद्दल अद्याप निर्णय घेतला नसल्याचे राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ प्रदीप आवटे यांनी सांगितले.

मुंबईत प्लाझ्मा थेअरीचा वापर करणार

कस्तुरबा रुग्णालयाने प्लाझ्मा थेरपी देण्याकरिता ICMR कडून मंजुरी मिळवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी योग्य दात्यांची यादी देखील करण्यात येत आहे. ज्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये कोरोना विरुद्ध प्रतिपिंडे तयार झाली आहेत आणि ज्यांना डिशचार्ज मिळाला आहे अश्या व्यक्तींची डोनर म्हणून निवड केली जाईल. नायर रुग्णालय हे प्लाझ्मा संग्रह केंद्र असणार आहे. ही प्रक्रिया यशस्वी व्हावी त्यासाठी पालिका प्रयत्न करीत असल्याचे कळते.

एका व्यक्तीच्या प्लाझ्मा मधून 4 रुग्णांचा उपचार

एका व्यक्तीच्या रक्तातून किमान 800 मिलीलीटर प्लाज्मा घेतला जाऊ शकतो. तर कोरोना बाधित व्यक्तीच्या शरीरात अँटीबॉडीज टाकण्यासाठी 200 मिलीलीटर प्लाझ्मा दिल्या जाऊ शकतो. बऱ्या झालेल्या व्यक्तीच्या प्लाझ्मातून 3 ते 4 रुग्णाचा उपचार केला जाऊ शकतो. 

health department is taking permission to conduct plasma therapy in mumbai   

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Praful Patel : ''होय, 2004 पासून भाजपशी युती व्हावी म्हणून मी आग्रही होतो'', प्रफुल्ल पटेलांनी सगळाच इतिहास काढला

SRH vs PBKS Live Score : हैदराबादला तिसरा धक्का! अर्धशतक करणाऱ्या अभिषेक शर्माला शशांक सिंगने धाडलं माघारी

Farooq Abdullah: फारुख अब्दुल्लांच्या सभेत चाकूहल्ला; 3 कार्यकर्ते जखमी, दोघांची स्थिती गंभीर

काँग्रेसमध्ये धुसफूस! मल्लिकार्जुन खरगेंच्या फोटोला काळे फासले, अधीर रंजन चौधरींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज

जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेच्या मतदानापूर्वी दहशतवाद्यांचा हल्ला! भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू, तर एक दाम्पत्य जखमी

SCROLL FOR NEXT