मुंबई

कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निगेटिव्ह झाल्यावर दिसतायत 'ही' नवी लक्षणं, स्वतः राजेश टोपेंनी दिली माहिती

सुमित बागुल

मुंबई : दिवसेंदिवस वाढणारी कोरोना रुग्णसंख्या धडकी भरवणारी आहे. कोरोनातून अनेकजण बरेही होतायत. मात्र अशातही कोरोनाचा धोका अद्यापही कायम आहे.  जगभरात कोरोनावर मोठ्या प्रमाणात संशोधन केलं जातंय. कोरोनाचं संकट परतवून लावण्यासाठी कोरोनावर लस शोधणं, त्याचसोबत इतर उपचार पद्धतींवर देखील अभ्यास सुरु आहे. ज्याप्रकारे उपचार आणि लसींवर संशोधन होतंय, तसंच कोरोनाच्या नव्या लक्षणाबाबत देखील माहिती समोर येतेय. ठराविक काही दिवसानंतर कोरोनाची नवीन लक्षणे आपल्याला समजतायत. 

देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर काल रात्री गृहमंत्री अमित शहा यांना श्वसनाचा त्रास आणि थकवा जाणवू लागला. त्यानंतर अमित शहा यांना दिल्लीतील 'एम्स'मध्ये पुन्हा भरती करण्यात आलंय.  

आज महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राजेश टोपे यांनी कोरोनाबाबत महत्त्वाची माहिती माध्यमांना दिली. राजेश टोपे यांच्या माहितीप्रमाणे जे रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत अशा रुग्णांना कोरोनाची नवीन लक्षणं पाहायला मिळतायत. यामध्ये श्वास घ्यायला त्रास होणे, थकवा येणे याप्रकारची ही नवीन लक्षणं आहेत. याबाबत सांगताना राजेश टोपे यांनी लक्षणांना घाबरण्याची गरज नसल्याचं सांगितलं. मात्र, श्वसनाचा त्रास झाला किंवा थकवा जाणवला तर तात्काळ रुग्णालयाशी संपर्क साधा, या गोष्टी अंगावर काढू नका असंही राजेश टोपे म्हणालेत.    

शरद पवारांची प्रकृती उत्तम : 

आज झालेल्या पत्रकार परिषदेत राजेश टोपे यांनी शरद पवारांच्या प्रकृतीबाबत देखील माहिती दिली. शरद पवारांची प्रकृती उत्तम असून त्यांची चाचणी निगेटिव्ह आल्याचं राजेश टोपे यांनी पुन्हा एकदा सांगितलं. दरम्यान सिल्व्हर ओक परिसरातील तब्बल दोनशे नागरिकांची तपासणी करणार असल्याचंही राजेश टोपे म्हणालेत. 

health minister rajesh tope shared crucial information about new post covid symptoms seen in patients

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Insurance: लहान फॉर्म अन् मोठा फायदा! PF खात्यातील या फॉर्मने कुटुंबाला मिळू शकतात 7 लाख रुपये

Hasan Mushrif Kolhapur ZP Political Strategy : बहुमत असूनही पेच? पण मुश्रीफांनी करून दाखवलं 'अशक्य ते शक्य'; कसं जुळवलं सत्तेचं समीकरण? वाचा सविस्तर...

Latest Marathi News Live Update : कल्याण मध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने भव्य मिरवणूक

Thane politics: राजकीय खळबळ! ‘उबाठा’चे चार नगरसेवक शिंदे गटात; मध्यरात्री ठाण्यात पक्षप्रवेश, जिल्हाप्रमुखांच्या हाती ‘धनुष्यबाण’

Crime News : बॅनरवर फोटो खाली का? नाशिकमध्ये नामांकित कॉलेजच्या विद्यार्थ्याचे अपहरण करून रात्रभर डांबले

SCROLL FOR NEXT