File Photo 
मुंबई

म्हाडा कर्मचाऱ्यांना सुग्रास जेवण

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) वांद्रे येथील मुख्यालयातील कर्मचाऱ्यांना सुग्रास जेवण मिळावे म्हणून कॅंटीन चालवण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. कॅंटीन चालवण्याचा अनुभव असलेल्या ठेकेदारालाच हे काम दिले जाईल, असे निविदेत नमूद करण्यात आले आहे.

म्हाडा मुख्यालयातील कर्मचारी आणि कामासाठी दररोज येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. या परिसरात सामान्य नागरिकांच्या खिशाला परवडणारे उपाहारगृह नाही. त्यामुळे कर्मचारी आणि नागरिकांनाही कॅंटीनशिवाय अन्य पर्याय नसतो. कामानिमित्त सकाळी 10 वाजता आलेले नागरिक तीन ते चार तास म्हाडा कार्यालयात असतात.

त्यामुळे कर्मचारी आणि नागरिकांसाठी नाश्‍ता आणि जेवणाची चांगली सोय करण्याच्या हेतूने म्हाडा प्रशासनाने मुख्यालयाच्या इमारतीत उपाहारगृह सुरू केले असून, सुग्रास जेवणासाठी अनुभवी ठेकेदाराचा शोध सुरू आहे. म्हाडा मुख्यालयातील कॅंटीन चालवण्यासाठी इच्छुक कंत्राटदाराला 50 पेक्षा जास्त टेबलांचे रेस्टॉरंट किंवा कॅंटीन चालवण्याचा अनुभव असावा, अशी अट घालण्यात आली आहे.

संघटनांची मागणी
मुंबई महापालिकेच्या कॅंटीनमध्ये 10 रुपयांत चांगले जेवण मिळते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवथाळी 10 रुपयांत देण्याची घोषणा केली आहे. या पार्श्‍वभूमीवर म्हाडा कॅंटीनचे कंत्राट संपल्यामुळे नव्या कंत्राटदाराने 10 रुपयांत चांगले जेवण द्यावे, अशी कर्मचारी संघटनांची मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran India Oil Supply : इराणकडून भारतात येणारा ‘होर्मुझ’ सामुद्रमार्ग बंद, फक्त ४५ दिवसांचा इंधनसाठा; केपलर संस्थेची माहिती

सेपरेशन एन्झायटी डिसऑर्डर शाळा, पालकांची जबाबदारी

आजचे राशिभविष्य - 04 मार्च 2026

मोठी बातमी! ‘एनए’ परवाना, नॉन-क्रीमिलेअर, जातीचा दाखला गावातच मिळणार; जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार गावात येणार; ‘या’ १६ सुविधा गावातच मिळणार

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

SCROLL FOR NEXT