मुंबई

वसुली वादाबाबत दाखल केलेल्या जनहित याचिकेवर 30 तारखेला होणार सुनावणी

- सुनीता महामुणकर

मुंबई, ता. 24 : पोलिस अधिकारी परमबीर सिंग आणि ग्रुहमंत्री अनील देशमुख यांच्यातील वसुली वादाबाबत दाखल केलेल्या जनहित याचिकेवर ता 30 रोजी सुनावणी घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने आज निश्चित केले. तर सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे सिंग यांना आता उच्च न्यायालयात याचिका करावी लागेल.

सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर आज न्या एस के कौल यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. तुम्ही मंत्र्यांवर आरोप केले आहेत आणि मंत्र्यांनी तुमच्यावर आरोप केला आहे. हे प्रकरण गंभीर आहे असे आम्ही मानतो, पण तुम्ही आधी उच्च न्यायालयात याचिका का करत नाही, असा प्रश्न खंडपीठाने विचारला. त्यामुळे आता सिंग उच्च न्यायालयात याचिका करावी लागेल. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी सिंग यांनी केली आहे.

सिंग यांची आयुक्त पदावरून उचलबांगडी केल्यानंतर देशमुख यांच्यावर खंडणी वसुलीचे आरोप केले आहेत. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन वाझे यांना देशमुख यांनी शंभर कोटी रुपये हॉटेल चालकांकडून वसूल करण्याचे टार्गेट दिले होते, असा आरोप केला आहे. याबाबत देशमुख यांची चौकशी करावी आणि सिंग यांनी आयुक्त पदावर असताना याचा तपास का केला नाही, हेदेखील तपासावे अशी मागणी पाटील यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिकेत केली आहे.

सीबीआय, ईडी किंवा अन्य स्वतंत्र यंत्रणेमार्फत हा तपास करावा कारण सरकार कडून निष्पक्ष तपास होणार नाही अशी शक्यता व्यक्त केली आहे. यावर आज न्या एस एस शिंदे आणि न्या मनीष पितळे यांच्या खंडपीठापुढे उल्लेख करण्यात आला.

सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनीही न्यायालयात जनहित याचिका केली आहे. याप्रकरणी स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे. वाझे  सध्या अटकेत असून उद्यापर्यंत त्यांचा ताबा एनआयएकडे आहे.

hearing on allegation made by parm bir singh on anil deshmukh will be done on 30th march

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT