मुंबई

Anil Deshmukh: अनिल देशमुखांना जामीन मिळणार का? कोर्टानं CBIला दिले 'हे' आदेश

सुनावणी ढकलली पुढे, 'या' दिवशी होणार पुन्हा सुनावणी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शंभर कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर आज विशेष सीबीआय कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टानं त्यांच्या अर्जाची दखल घेत त्यावर १४ ऑक्टोबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश सीबीआयला दिले आहेत. (Hearing on Anil Deshmukh bail application Courts gave order to CBI)

न्यायालयीन कोठडीत असलेल्या अनिल देशमुख यांना कालच ईडी कोर्टानं जामीन मंजूर केला. पण त्यांची तुरुंगातून सुटका होऊ शकली नव्हती. कारण सीबीआयकडूनही याच खंडणी प्रकरणी त्यांची चौकशी सुरु आहे. त्यामुळं जोपर्यंत सीबीआयकडून त्यांना जामीन मिळत नाही तोपर्यंत त्यांची तुरुंगातून सुटका होणार नाही.

दरम्यान, सीबीआयनं कोर्टानंही आपल्याला जामीन मंजूर करावा यासाठी अनिल देशमुख यांनी कोर्टात धाव घेतली आहे. ईडीनं त्यांना ज्या प्रकरणात जामीन मंजूर केला आहे त्याच प्रकरणाची सीबीआयकडूनही चौकशी सुरु आहे. त्यामुळं विशेष पीएमएलए कोर्टाप्रमाणं सीबीआय कोर्टानंही आपल्याला जामीन द्यावा, अशी मागणी त्यांनी आपल्या जामीन अर्जातून केली आहे.

अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला होता. या आरोपांनंतर देशमुख यांना आपलं गृहमंत्रीपद सोडावं लागलं होतं. त्यानंतर ईडीकडून आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर कोर्टानं त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर देशमुख सुमारे वर्षभरापासून मुंबईतील ऑर्थर रोड तुरुंगात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel War: होर्मुजच्या समुद्रधुनीत भारत इराणविरुद्ध युद्धनौका तैनात करणार? ट्रम्प यांच्या आवाहनावर परराष्ट्र मंत्रालयाने दिलं उत्तर

Pune News: सुरक्षारक्षकाच्‍या सतर्कतेमुळे युवती सुखरूप परतली घरी; युवती रात्रभर अंधारात, अन् खडकवासला धरण परिसरात काय घडलं!

Pune Pollution: प्रदूषण रोखण्याची घोषणा हवेतच! पुणे महापालिकेला बांधकाम प्रकल्पांवर सेन्सर बसविण्याचा विसर, धूलिकणांचा आरोग्यावर गंभीर परिणाम..

Javali politics: जावळीच्या राजकारणात शिवेंद्रसिंहराजेच'धुरंधर'; दोन्ही पदांवर भाजपचाच झेंडा, राष्ट्रवादीच्या शिल्पा शिंदे तटस्थ!

Latest Marathi Update: DRDO चे माजी शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर जासूसी प्रकरण

SCROLL FOR NEXT