heat wave reason, heat wave News,  GOOGLE
मुंबई

उष्णतेच्या लाटांचे प्रमाण आणि तीव्रता का वाढली ?

जागतिक तापमानवाढीमुळे साल २००० नंतर उष्णतेच्या लाटांचे प्रमाण आणि तीव्रता वाढली. पूर्वी एखाद..दुसरी लाट येत असे. आता ४ ते ५ लाटांचा अनुभव येतो. उष्णतेची लाट २ ते ३ दिवस राहाणे अपेक्षित आहे. अलीकडे काही ठिकाणी ५ दिवस ही लाट राहाते. तीव्रता अधिक असल्यास ७ दिवसही प्रभाव राहातो.

नमिता धुरी

जम्मू-काश्मीरपासून उत्तरेकडील सर्व राज्ये व मध्य भारतापासून ते महाराष्ट्रापर्यंत सध्या उष्णतेच्या लाटेची स्थिती आहे. विदर्भात ९ ते ११ एप्रिल दरम्यान पुन्हा एकदा उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विशिष्ट वातावरणीय स्थितीमध्ये उष्णतेची लाट निर्माण होणे ही सर्वसाधारण घटना असली तरीही अलीकडच्या काळात या लाटांचे प्रमाण आणि तीव्रता वाढलेली दिसत आहे. त्यामुळे उष्णतेची लाट ही संकल्पना नक्की काय आहे, ती कशी निर्माण होते, तिचे परिणाम काय असतात, याविषयी जाणून घेऊया. (Heat wave news updates)

उष्णतेची लाट कशी निर्माण होते ?

...वायव्य भारतात प्रतिचक्रवात स्थिती निर्माण झाल्याने जमिनीलगतची हवा वर जाऊ शकत नाही. शिवाय आकाश निरभ्र असल्याने सूर्यकिरणे थेट जमिनीवर पडून हवा तापते. या स्थितीचा परिणाम देशाच्या विविध भागांवर होतो. वायव्य भारतातून येणाऱ्या कोरड्या आणि गरम वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातही विविध ठिकाणी उष्णतेची लाट निर्माण होते.

INCREASING TEMPERATURE

उष्णतेच्या लाटेचे निकष काय असतात ?

..... मुंबईसारख्या समुद्र किनारी शहरांमधील कमाल तापमान ३७ अंशांच्या वर, जम्मू काश्मीरसारख्या डोंगराळ भागांतील कमाल तापमान ३० अंशांच्या वर जाणे आणि मैदानी प्रदेशातील कमाल तापमान ४० अंशांच्या वर जाणे हा उष्णतेच्या लाटेसाठी पहिला निकष आहे. कमाल तापमान हे सरासरीच्या तुलनेत ४.५ अंश ते ६.४ अंशांपर्यंत अधिक असेल तेव्हा उष्णतेची लाट समजली जाते. सरासरीच्या तुलनेत कमाल तापमान ६.५ अंशांनी किंवा त्यापेक्षा अधिक वाढल्यास उष्णतेची तीव्र लाट समजली जाते. अशाप्रकारची स्थिती दोनपेक्षा अधिक केंद्रांवर नोंदवली जाणे आवश्यक असते. सलग दोन दिवस हीच स्थिती राहिली तरच दुसऱ्या दिवशी हवामान विभागातर्फे उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला जातो. जेव्हा कमाल तापमान ४५ अंशांपर्यंत पोहोचते तेव्हा सरासरीशी तुलना न करताच इशारा जाहीर केला जातो.

हा जागतिक तापमानवाढीचा परिणाम आहे का ?

.... जागतिक तापमानवाढीमुळे साल २००० नंतर उष्णतेच्या लाटांचे प्रमाण आणि तीव्रता वाढली. पूर्वी एखाद..दुसरी लाट येत असे. आता ४ ते ५ लाटांचा अनुभव येतो. उष्णतेची लाट २ ते ३ दिवस राहाणे अपेक्षित आहे. अलीकडे काही ठिकाणी ५ दिवस ही लाट राहाते. तीव्रता अधिक असल्यास ७ दिवसही प्रभाव राहातो.

HEAT WAVE AND GLOBAL WARMING

उष्णतेच्या लाटेच्या इतिहासातील नोंदी काय आहेत ?

.... मार्च ते जून हा उष्णतेच्या लाटांचा कालावधी असतो. मुंबईत मात्र मार्च महिन्यातच ही स्थिती निर्माण होते. गेल्या वर्षी मोसमी पाऊस उशिराने आल्यामुळे दिल्लीत जुलै महिन्यातही उष्णतेची लाट आली होती. ही दुर्मीळ परिस्थती आहे. मुंबईत १९८१ आणि १९८७ साली ४ आणि ५ मार्चला उष्णतेची लाट आली होती. २००० साली २५ आणि २६ मार्चला, २०११ साली १७ आणि १८ मार्चला उष्णतेची लाट आली होती. आतापर्यंत देशातील सर्वाधिक कमाल तापमान १९ मे २०१६ साली राजस्थानात ५१ अंश सेल्सिअस असे नोंदवले गेले होते.

HEAT WAVE AND HUMAN LIFE

याचा मानवी आरोग्यावर काय परिणाम होतो ?

....उष्णतेच्या लाटेमुळे उष्माघात होऊ शकतो. डोकेदुखी, उलट्या, ताप येणे अशा आरोग्याच्या तक्रारी उद्भवतात. उष्माघातामुळे व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो. तसेच अति तापमानामुळे शरीराचे निर्जलीकरण होऊ शकते. आतापर्यंतच्या नोंदीनुसार २०१५ साली उष्णतेच्या लाटेचा सर्वाधिक प्रभाव जाणवला होता. यावेळी देशभरात २ हजार ५०० नागरिकांचा मृत्यू झाला होता. २०१६ सालीही उष्णतेची लाट तीव्र होती; मात्र तुलनेने कमी प्रभाव पडला.

काय काळजी घेतली पाहिजे ?

.... शक्यतो दुपारी १२ ते ३ या वेळेत नागरिकांनी घराबाहेर पडू नये. बाहेर फिरताना डोके कापडाने झाकावे. भरपूर पाणी प्यावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs AUS : पथूम निसंका पहिला शतकवीर! श्रीलंका Super 8s मध्ये, ऑस्ट्रेलियाचे नशीब 'आयर्लंड'च्या हाती; जाणून घ्या समीकरण

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी ठरु शकते धोकादायक, 'हे' उपाय करा नाहीतर होईल मोठी हानी!

Muhammad Yunus Resigns : मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागारपदाचा दिला राजीनामा!

Mani Shankar Aiyar : ‘’मी गांधीवादी, नेहरूवादी, राजीववादी आहे, पण राहुलवादी नाही’’ ; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर थेटच बोलले..!

Pune Shivjayanti : रस्त्याच्या कामामुळे शिवजयंती मिरवणूक मार्गात बदल; महापौरांचे आदेश

SCROLL FOR NEXT